संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
सर्व साधारण पणे हिंदू संस्कृती म्हटले की चातुर्मास , श्रावण ते कार्तिक या चार महिन्यात व्रतवैकल्ये सणवार यांची रेलचेल असते .सण आला की विविध व्रते फेडण्यासाठी आवश्यक साहीत्य खरेदी करण्यासाठी शहरांतील बाजारपेठा सजू लागतात व ग्राहकाना खुणावू लागतात गोकुळ अष्टमीच्या म्हणजेच दहीहडीच्या सेलिब्रेशनसाठी फार मोठ्या प्रमाणात मडकी व शिकी बाजारांत आली आहेत . म्हसळा शहरांतून व आजूबाजुच्या कुंभार समाजाच्या वाड्यांमधून या वर्षी रंगी-बेरंगी मडकी मोठया प्रमाणांत आली आहेत. दही हांडीसाठी कापड दुकानांतून बाल- गोपाळांपासून मोठयांपर्यंत लागणारे विविध रंगातील लेंगा, धोती, झब्बा , टी शर्ट हे होजीअरी मधील सर्व प्रकार अत्यंत माफक दरांत आले आहेत, गोकुळ अष्टमी गणपती या दोनही सणांसाठी छोटयाना ताल धरण्यासाठी लागणाऱ्या छोटया ठोलक्या बाजारात गजर करू लागल्याने त्यांची मागणी ही वाढू लागली आहे. बाजारपेठा सुध्दा भर-भरून बोलत आसल्याचे म्हसळा बाजारपेठेचे दृश्य आहे.


Post a Comment