संजय खांबेटे , म्हसळा
म्हसळा शहरांत केलटी, माकडे यांच्या पाठोपाठ आता वानरसेनेने हैदोस घातला आहे. शहरांत गेले काही वर्षे कन्या शाळा , विद्यानगरी, तांबट आळी, ब्राह्मण आळी , जैन कॉलनी, कुंभार वाडा, गौळवाडी, वाऱ्याचा कोंड, नवा नगर , बाजार पेठ या परीसरांत
केलटी व माकडे ह्यांचे माकड चाळ्याने नागरीक हैराण होत असताना आता नव्याने काळ्या तोंडाचे वानरानी शहरांतील काही भागात घुडकुस घातल्याचे चित्र आहे. त्यानी नवानगर , इदगा, रेस्ट हाऊस, फॉरेस्ट कॉलनी , सार्वजनिक वाचनालय, पंचायत समीत ,उकये- काजी मोहल्ला या परीसरांत वानर टोळ्या मोठ्या प्रमाणांत आल्या आहेत . शहरांतील घरांची कौले , उंच इमारतींचे पत्रे ह्याचे नुकसान करत असतानाच T.V., टेलीफोन केबल वरून उडया मारत आसल्याने T.V व टेलीफोन मध्ये सतत बिघाड होत असतात. शहरांतीत परसबागा व अन्य फळबागायतीचे प्रचंड नुकसान व नासाडी केली आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतीमालाचे झालेल्या नुकसानी बद्दल मागील ३ वर्षांत तालुक्यातील शेतकऱ्याना १.७२ लक्ष नुकसान भरपाई दिली आहे. विविध पिकांचे रु १० हाजाराचे नुकसान केल्यास किमान रु१ हजार, व १० हजारा पेक्षा जास्त नुकसान आसल्यास नुकसानीच्या ८० % व कमाल रु २५ हजार नुकसान भरपाई मिळू शकते.
-वन विभाग, म्हसळा

Post a Comment