तोराडी गावावर दरडीचे सावट : आदिवासी कुटुंबावर वास्तव्याचा यक्षप्रश्न ;दरड प्रवण क्षेत्राची फक्त पाहणी...



श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
म्हसळा तालुक्यात   मागील काही दिससांपासुन जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातील गावावर दरडीचे सावट निर्माण झाले आहे.तोरडी गावातील जनता दरडीच्या छायेखालीच जीवन जगत असल्याचे दिसत आहे.
    निऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अहवाला नुसार तोराडी गावास दरड प्रवण क्षेत्रात वर्गीकरण केले आहे.म्हसळा शहरापासुन साधारण 21 किमी अंतरावर पांगलोलीच्या लगत  सावित्री नदिच्या तीरावर तोराडी ग्रामपंचायत आहे .तोराडी ग्रामपंचायत ची लोकसंख्या 1100 च्या आसपास आहे .एस टी स्थानकाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी  ही घरे वसलेली आहेत .घरांची बांधणी साधी आहे .घरे सुव्यवस्थित स्थितीत निदर्शनास येतात .कौलारू ,व सिमेंट चा वापर घर बांधणीत केला आहे . तोराडीच्या भागात गरीब सर्वसामान्य  लोकांची संख्या जास्त आहे.तोराडी  म्हसळा  शहरापासुन डोंगराळ भागात  मुख्यत: डोंगराच्या पायथ्याशी आहे .त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे जमीन भुसभुशीत बनते त्या कारणे डोंगर माथ्यावरील झाडे उन्मळून पडतात व मोठमोठ्या दगडी पायथ्याशी येतात .तोराडी च्या डोंगर पायथ्या जवळ वसलेल्या घरांना दरडीची धोका निर्माण झाला आहे.
म्हसळा तालुक्यातील  तोराडी ही महत्त्वाची ग्रामपंचायत आहे .शेती  व मासेमारी हा तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती व घरे ही मुख्यतः डोंगराच्या कुशीत वसलेले आहे त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

तोरडी गावात एस टी थांब्याच्या लगत आदिवासी कुटूंबाचे वास्तव आहे .सदर ची कुटुंबे दोन पिढी पासून त्या ठिकाणी राहत आहेत. परंतु  गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने घरच्या वरच्या बाजूला असलेल्या ठिकाणा पासून माती निघण्यास प्रारंभ झाला आहे .तसेच घराच्या   वरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर काही प्रमाणात तडे गेले आहेत. त्या मुळे सदर आदिवासी कुटुंबावर दरड कोसळण्याची भिंती निर्माण झाली आहे .2014 मध्ये तोरडी गावाच्या हद्दीत व कुंभळे गावाच्या लगत मंदिरा जवळ दरड कोसळली होती .त्या मध्ये आर्थिक व जीवित हानी झाली होती. त्या नंतर शासकीय यंत्रणे कडून योग्य पावले उचलणे गरजेचे होते परंतु अद्याप शासकीय यंत्रणेने दरड प्रवण गावा संदर्भात भूमिका साकारलेली नसल्याचे निदर्शनास येते आहे.

आदिवासी कुटुंबातील अरविंद पवार ला.गेल्या वर्षी झालेल्या गाडी अपघातात अपंगत्व आले आहे .त्याचे दोन भाऊ
सुरेश पांडुरंग पवार  व रवी पवार यांचे एकत्रित कुटूंब राहते .
 महेंद्र रवी पवार वैशाली रवी  पवार , अरविंद चे चार अपत्ये अश्विनी , अंजली , अनुसया, अनुज, सुरेश चे गौरी ,अंकिता ,सुजाता,रंजना असे कुटुंब आहे .आजमितीस सदर कुटुंबा पुढे वास्तव्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.म्हसळा तालुक्यातील सहा  गावांचा दरदग्रस्त गावात समावेश करण्यात आला आहे त्या मध्ये तोरडी गावाचा समावेश आहे .तालुक्यातील पाष्टी ,मदाटणे, पाणंधरे ,पांगलोली ,कुंभळे ही सर्व गावे डोंगराच्या कुशीत वसलेले आहेत .महाबळेश्वर ला उगम पावलेली सावित्री नदी तोरडी गावाच्या लगत आडी गावा पासून बाणकोट मार्गे अरबी समुद्राला मिळते .पर्जन्याचे प्रमाण म्हसळा तालुक्यात सदैव जास्त असते .

माझ्या आजोबा पासून आम्ही या जागेवर राहतो .माझ्या कुटुंबात लहान मुले आहेत त्या मुळे दरडीचे प्रचंड भीती वाटत आहे पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्ही झोपडीतून बाहेर पडून एस टी थांब्याच्या ठिकाणी जाऊन आसरा घेतो .कमावण्याचे साधन नाही त्यामुळे दुसरे घर विकत घेणे शक्य नाही .त्यामुळे जीव मुठीत धरून जीवन जगत आहे .
   अरविंद पवार (आदिवासी कुटुंबातील सदस्य तोराडी ग्रामस्थ )

 शासनाने ग्रामपंचायतीस नोटीस बजावली आहे .परंतु गेली अनेक वर्षे आम्ही या ठिकाणी राहत आहोत .सरकारने जनभावना लक्षात घेऊन जनतेच्या सोई साठी योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे .
-जनाब  कौचाली( ग्रामस्थ तोरडी) 

निऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वे च्या अहवालात नमूद केलेल्या सर्व दरड प्रवण ग्रस्त गावांना योग्य ते मार्गदर्शक सूचना करण्यात आले आहेत त्या नुसार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात जनतेचे सहकार्य गरजेचे आहे .
  रामदास झळके (तहसीलदार म्हसळा )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा