सरकारची प्रशासनावर योग्य वचक नसल्याने योजनांचे करोडो रुपये पाण्यात गेले - आ. अनिकेत तटकरे..

म्हसळ्यात सरकारवर हल्लाबोल ; पंधरा दिवसांत प्रशासनाविरुद्ध तिव्र आंदोलनाचा दिला इशारा

वैभव कळस
             म्हसळा : तालुक्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्थाचे आ. अनिकेत तटकरे यांचा दोन दिवसीय झंझावत दौरा झाला असून या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजप-सेना सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने या चार वर्षामध्ये ज्या योजनांची घोषणा केली आहे व जाहिरातीच्या माध्यमातून योजनांवर करोडो रुपये खर्च केले आहेत ते पैसे सरकारचे प्रशासनावर योग्य वचक नसल्याने पाण्यात गेल्याची टिका केली आहे. योजनांची जी अंमलबजावणी योग्यरीत्या व्हायला हवी ती प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे होत नाही. याचा फटका सामान्य जनतेला बसत असून त्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी आपल्या आमदार फंडातुन निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच संबंधित खात्याचे मंत्री महोदय यांची येत्या आठवड्यात भेट घेऊन जनतेच्या समस्यांवर चर्चा करु असा विश्वास या वेळी आ. तटकरे यांनी व्यक्त केला. 
              येत्या पंधरा दिवसांत संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी जनतेच्या समस्या मार्गी लावण्या संदर्भात जर अंमलबजावणी केली नाही तर मात्र प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच असेल असा इशाराही आ. अनिकेत तटकरे यांनी दिला. जनतेच्या या सर्व समस्याची दखल घेत आ. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करुण स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांना योजनांची तत्काळ अमलबजावनी करण्याबाबत सुचना दिल्या असून वरिष्ठ पातळीवरिल अधिकाऱ्यासोबत फोनद्वारे संपर्क करून स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यामुळे कामात येणाऱ्या अडचणीबाबत जाणीव करून दिली असल्याची माहिती आ. अनिकेत तटकरे यांनी पाभरे येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. 
             यावेळी या सभेमध्ये जेष्ठ नेते आलिशेठ कौचाली, म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर , उपाध्यक्ष शहीद उकये, महिला तालूका अध्यक्षा रेश्मा कानसें, सभापती उज्वला सावंत, उपसभापती संदीप चाचले, सदस्य मधुकर गायकर, सदस्या छाया म्हात्रे, युवक अध्यक्ष फैसल गिते, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, उपाध्यक्ष गजानन पाखड, श्रीवर्धन मतदार संघ युवक अध्यक्ष संतोष पाखड, ओ.बी.सी. सेल अध्यक्ष अशोक काते, समीर काळोखे, राजू लाड, शहीद बगदादी, रमेश कानसें तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. अनिकेत तटकरे यांच्या दोन दिवस म्हसळा दौऱ्यामध्ये त्यांनी म्हसळा शहरात घेतलेल्या सभेत नगरपंचायतीच्या इमारतीबाबत देखील आढावा घेतला असून, दर महिन्याला जातीने लक्ष घालून नगरपंचायत निधी व विकासकांमाबाबत आढावा घेणार असल्याची माहिती नगरसेवकांना दिली. यापुढे मेंदडी, वाडांबा व आंबेत येथे देखील कार्यकर्त्यांसोबत सभा घेऊन त्यांना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा