म्हसळयात राष्ट्रवादीला खिंडार : नगरपंचायत कारभारावर नाराज कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये प्रवेश ; २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करणार

फोटो -राष्ट्रवादी पक्षातून राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याचा स्वागत करताना तालुका अध्यक्ष डॉ.शेख व इतर पदाधिकारी दिसत आहेत.

संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा शहर नगरपंचायत व तालुक्यांत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोगस व भ्रष्ट कारभाराला लक्ष करीत व नगरपंचायतीतील  नगरसेवकांच्या मनमानी कारभार आता बिलकुल नको अशी स्पष्ट नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी
व  कार्यकर्त्यानी आज दि ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या मध्ये शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे रफीक घरटकर, अबुल हुर्जुक, मुनीर दळवी, शकील ऊकये, सलीम दळवी वसीम दळवी,  शफी पेनकर, जियाद दफेदार,उमेर दफेदार, वसीम म्हसळाई, फहद दळवी, तहा घरटकर, संजय(मुन्ना) टिके, शशिकांत तांबे (सुरई), किसन कांबळे (वडवली) यांचा समावेश आहे. प्रवेश कर्त्यनी  थेट नगरपंचायतीच्या नगरसेवकांवर व सी .ई.ओ. ना हाताशी धरून करत असलेल्या बोगस टेंडर, निकृष्ट दर्जाची कामे, नियमांचे उल्लंघन करून होत असलेली कामे, स्थानिक कचरा व्यवस्थापनात होत असलेला भ्रष्टाचार, दोनदा उद्घाटन करूनह आणि  तब्बल ९ वर्ष होऊनही पाणी पुरवठा योजना या सर्वांवर काँग्रेसने ठपका ठेवला व काँग्रेसचे नवीन  व प्रभावी नेतृत्व डॉ. मुईज शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये कॉग्रेस तर्फे कॉग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, युवक अध्यक्ष अकमल कादीरी, नदिम दफेदार,नाजीम चोगले, सलाम हळडे, शौकत घरटकर, सुजाउद्दीन काझी, अश्फाक काठेवाडी,शफी पेनकर, मुश्ताक दफेदार, इब्राहीम कासार,पंगलोली चे कार्यकर्ते मा. सलीम धनसे, इसाक कौचाली, मेहबूब धनसे, रजाक धनसे,वरवठणे येथून अखलाक शिरशिकर, विजय गमरे व सबा गळसुरकर व अन्य कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हसळा शहर, तालुका , जिल्हा परीषद व विधान सभेचा आमदार  असे बहुतांश नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असूनही तालुक्याचा विकास ठप्प आहे. 2019 चा लोकसभा उमेदवार आमचा असेल. नाहीतर आमचे मत अन्यत्र असणार. - अस्लमभाई

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा