श्रीवर्धन मध्ये महसुल दिवस साजरा ; सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील हास्य महत्वाचे आहे- डॉ विजय सुर्यवंशी (जिल्हाधिकारी रायगड )


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
देशातील प्रशासन व्यवस्था सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षा व सेवेसाठी तत्पर आहे .सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याची ताकद आपल्या ठायी आहे .सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ विजय सुर्यवंशी यांनी महसूल दिनी केले .
      श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी श्रीवर्धन तालुक्यातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना संबोधित केले .सरकारी यंत्रणा व जनता यांचा निकटचा संबध असतो .जनता आपल्या कडे एका आशेने बघत असते .आपण मनात आणल्यास अनेक बाबी सहज शक्य होतील .त्यामुळे आपण जनतेच्या हितास प्राधान्य देणे आवश्यक आहे. आपण सर्व जण वर्षभर 364 दिवस काम करत असतात .आजचा दिवस त्या कामाचा गौरव करण्याचा दिवस आहे .आपण केलेले कार्य आपली ओळख आहे .जनतेत प्रशासकीय यंत्रणे बद्दल प्रेम व आपुलकी आपण आपल्या कार्या द्वारे निर्माण करत असतो .जनतेच्या मनात निर्माण झालेला आदर व आपुलकी फार महत्वाची आहे. आपण जनतेच्या   सेवेसाठी कटिबद्ध आहोत .जिल्ह्यातील प्रत्येक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या .जनतेची समस्या ही आपली समस्या आहे .ग्रामपातळीवर काम करणारा प्रत्येक घटक महत्वाचा आहे .कारण गाव हा प्रशासकीय यंत्रणेत महत्वाची भूमिका बजावत असतो .तलाठी हा जनता व  महसुल प्रशासन यांच्या मधील महत्वाचा दुवा आहे .आपण सर्वांनी वर्षभर निरंतर काम केले आहे .आपल्या काही समस्यांचे निराकरण झाले आहे उर्वरित समस्यांची उकल केली जाईल .महसुल दिनाचे औचित्य साधून अनेक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्या बद्दल त्या सर्वांचे अभिनंदन करतो. सर्वांनी केलेले कार्य महत्वाचे आहे.जनतभिमुख प्रशासन आपण निर्माण करू असे जिल्हाधिकारी डॉ विजय सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात म्हंटले .
           कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी उपस्थित कर्मचारी वर्गास संबोधित केले .त्या मध्ये महसुल कर्मचाऱ्यांनी वर्षभर केलेल्या कामाचा गौरव त्यानी केला  .तालुक्यातील प्रत्येक घटका पर्यंत शासकीय योजना पोहचविल्या जातील त्या अनुषंगाने तालुका प्रशासन कार्यरत असल्याचे सांगितले.
तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाचे स्वागत केले .
 सदरच्या कार्यक्रमासाठी शिवाजी जाधव ,श्रीधर बोधे,किरण पणबुडे,
भरत शीतोळे प्रमुख अतिथी उपस्थित होते .
 १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसुली यांचा ताळमेळ घेण्याचे काम महसुली यंत्रणेकडून केले जाते. त्यामुळे प्रत्येक नवे महसूल आकारणी व वसुलीचे उद्दिष्ट घेऊन राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालये, ३५ जिल्ह्ये, ३५८ तालुके, १८0 उपविभागीय अधिकारी कार्यालये, १५६४ महसूल मंडळे, तर १२ हजार ३६७ तलाठी साज्यात कार्यरत महसूलचे अधिकारी, कर्मचारी नव्या जोमाने काम करत असतात. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्‍या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव व्हावा,  म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जात आहे . राज्य शासनाने १९ जुलै २00२  पासून महसूल दिवसाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा