वडवली सजा तलाठी कार्यालय झाले स्वमालकीचे ; जिल्हाधिकारी डॉ . विजय सुर्यवंशी यांनी केले लोकार्पण


वेळास - आगर , संतोष शिलकर
श्रीवर्धन तालुका तहसिल कार्य क्षेत्रातील मौजे - वडवली सजा अंतर्गत महसुली गाव मौजे वडवली , कुडकी , खारशेत , भावे , मूळ - वेळास , आगर वेळास अश्या सहा महसुली गावांच तलाठी कार्यालय सध्या कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष तलाठी दत्ता करचे यांच्या इच्छा शक्तीने जागृत झालेली संकल्पना या विभागातील दानशूर व्यक्तीनी उचलून धरली . या दानशूरांनी सहकाराचा हात पुढे करत सुदंर ईमारत उभी राहिली . वडवली सजा तलाठी कार्यालय व महसूल विभागाच्या स्व - मालकीच्या इमारतीचं उदघाटन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले . गेली कित्येक वर्ष भाडे तत्वावर असलेलं वडवली सजा तलाठी कार्यालय मात्र देणाऱ्यांचे हात हजार , देणाऱ्याने देत रहावे घेणार्यांनी घेतची रहावे म्हणता म्हणता बुधवार दि . १ ऑगस्ट रोजी महसुल दिनाचे औचित्य साधून मौजे - वडवली सजा तलाठी कार्यालय व महसूल विभागाच्या इमारतीचे उदघाटन रायगड जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रताधिकारी प्रविण पवार यांच्या व श्रीवर्धन तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यालयाचे उद्घाटन झाले . लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामास वस्तू व सेवा रूपामध्ये सहकार्य करणार्या नरेंद्र भल्ला , आमदार भाई जगताप किसनराव बांदल , सुनिल बाविस्कर , उदय बापट , सदानंद खेऊर किशोर पिळणकर , प्रदीप मुरकर , सुनील जोशी , महम्मद मेमन , दिनेश खेऊर , उमेश बिहाडी , अरविंद शिसतकर , रवींद्र मांजरेकर , संदीप बिराडी , मंगेश धनावडे , संदेश कीर , तुकाराम भायदे , हर्षद नजीर श्याम नाकती व कंत्राटदार सुरेश धुमाळ यांचा जिल्हाधिकारी , अपर जिल्हाधिकारी , निवासी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ . सूर्यवंशी यांनी कार्यशील तलाठी दत्ता करचे यांचा विशेष कौतुकाने गौरव केला . गाव करेल ते राव करेल काय ही उक्ती इथे लागू पडली आहे असे ते म्हणाले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा