म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यात ग्रामिण रस्ते, इतर जिल्हा मार्ग , राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग आशा वर्गवारीचे रस्ते असुन सर्वच रस्त्याना प्रंचड खड्डे पडले आहेत. सदरचे खड्डे शासनाने तात्काळ बुजवावे अशी मागणी म्हसळा शहर रिक्षा चालक - मालक संघटनेचे हितेश गाणेकर, मुकेश कांबळे यानी व त्यांच्या संघटनेनी शासनाकडे लाऊन धरली आहे. नव्याने जाहीर झालेला माणगाव -दिघी या राष्ट्रीय मार्गावरील सर्वच रस्ता वाहतुकीस आयोग्य असतानाच म्हसळा शहरातील न्यु इंग्लिश स्कूल ते दिघी नाका ते दिधी पर्यंतच्या सर्वच रस्त्यावर पोर्टच्या अवजड वाहतुकीने मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत हे खड्डे शासनाने संबंधितांकडुन तातडीने भरावेत आशा मागणीचे निवेदन म्हसळ्याचे तहसीलदार रामदास झळके व सपोनी प्रविण कोल्हे यांचेकडे दिले आहे . यावेळी मिनिडोअर चालक मालक यांचे सह माजी सभापती महादेव पाटील,सरपंच अनंत नाक्ती,कौस्तुभ करडे, मुकेश कांबळे,संतोष पानसरे,अरविंद शिंदे, विश्वनाथ काजारे,हेमंत कांबळे,यशवंत कांबळे,बोर्ले ,दिनेश नाक्ती, हितेश गाणेकर,मनोहर कांबळे,अविनाश जंगम,किशोर गाणेकर आदि उपस्थित होते.निवेदनात पडलेल्या खड्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , केवळ खुडयांमुळे प्रवाशांजवळ व चिखल उडाळ्यामुळे पादचाऱ्यांजवळ शाब्दीक बाचाबाची होत असते. या सर्व घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तविली आहे.तसेच या रस्त्यावर वाहनांची आदळआपट होऊन जास्त प्रमाणात नादुरतस्त होत आहेत.प्रवासात इंधन आणि वेळही जास्त प्रमाणात खर्च होतो.एकंदरीत या रस्त्यावर चालणे जिकरीचे होऊन बसले आहे तरी म्हसळा तालुक्यातील सर्वच खड्डेमय रस्त्यांची तातडीने दखल घेवुन वाहतुकीसाठी सुरळीत करून मिळावेत अशी मागणी संघटनेनी केली आहे.
.
म्हसळा शहर रिक्षा चालक - मालक संघटनेचे शहरांत सामाजिक काम अत्यंत पारदर्शक आहे. त्यांच्या मागणीला शासनाने सकारात्मक साथ देणे आवश्यक आहे . भविष्यात येणारे विविध धर्मीयांचे सण व खड्डयांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्यासूचित केलेल्या शक्यतेवर शासनाने अभ्यास करणे गरजेचे आहे, संघटनेची मागणी रास्त आहे .महादेव पाटील, माजी सभापती पं.स. म्हसळा
फोटो म्हसळा शहरांतील खड्डेमय रस्ते.


Post a Comment