आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चा..



संजय खांबेटे, म्हसळा 
मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आश्वासने नकोत आता ठोस अमलबजावणी हवी. सरकारवर आमचा विश्वास नाही म्हणूनच आज सकल मराठा समाजाकडून म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याचे  स्थानीक आयोजक  व्यंकटेश सावंत व नंदू शिर्के यानी सांगितले. मोर्चात श्रीमती वैशाली सावंत,अनिल महामुनकर , राजू सावंत, मुरलीधर महामुनकर, किरण पालांडे, रवी दळवी,विष्णु विचारे, मोहन सावंत,मधु विचारे, नितीन सावंत, भालचंद्र सावंत, सचिन महामुनकर, दयानंद महामुनकर,चद्रकांत विचारे, संतोष सावंत, बाबू शिर्के, अमित महामुनकर, अंकुर मोरे, रवी सावंत , मंगेश शिर्के आदी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बहुसंखेने होते. यावेळी आयोजक व्यंकटेश सावंत व नंदू शिर्के यांच्या नेतृत्वा खाली तहसीलदार रामदास झळके व स. पो.नी. प्रविण कोल्हे याना राज्याचे मुख्यमंत्री याना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यांत आले.तालुक्यातील नागरी प्रवासी वाहतुक ( एस .टी) बंद असुनही तालुक्यातील सर्व भागांतुन मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभावी झाल्याबदल  व महसुल व पोलीस प्रशासनाला मोर्चेकरांतर्फे श्रीमती सावंत यानी धन्यवाद दिले.मोर्चा कालावधीत शहरात स.पो.नी. प्रविण कोल्हे यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.


आंदोलनाची दिशा

१ ) सरकारने आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे

२ ) २२ मराठा तरुणानी आत्म बलीदान केले आहे, त्यांच्या कुटुंबीयाना रु ५० लाख व नोकरी द्यावी. अशा प्रमुख मागण्या आसल्याचे आयोजकानी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा