म्हसळा तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा जिजामाता हायस्कुल , वरवठणे- आगरवाडा येथे होणार..


 संजय खांबेटे म्हसळा -प्रतिनिधी
जिल्हा क्रिडा परिषद रायगड ने आयोजीत केलेल्या म्हसळा तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा या वर्षी  जिजामाता हायस्कुल , वरवठणे- आगरवाडा  येथे सोमवार दि.२७ ऑगस्ट २०१८ रोजी होणार आसल्याचे तालुका क्रिडा समितेने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. सदर स्पर्धांचे उद्घाटन तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती श्रीमती छाया म्हात्रे, उप -सभापती संंदीप चाचले, जि.प. सदस्य बबन मनवे, धनश्री पाटील, जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील, स. पो.नि. प्रविण कोल्हे, ग.वि. अ .वाय.एम. प्रभे ,ग.शी.अ. संतोष शेडगे व पं.स.चे अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. 

पावसाळी क्रिडा स्पर्धा गेले अनेक वर्ष म्हसळा शहरांतील शाळांतून होत असत, बहुतांश खेळांत ग्रामिण भागातील स्पर्धकांचा जास्त सहभाग असे. स्पधेचे ठिकाण बदलल्या मुळे ग्रामिण भागांतून मोठ्या प्रमाणात स्पर्धक येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा