७० वर्षाची परंपरा राखत म्हसळयात ऊत्साहातना रळी पोर्णिमा साजरी.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
जलदेवतेला महत्त्व असणारा नारळी पोर्णिमा हा सण म्हसळयातील ग्रामस्थ व प्रशासनाने ७० वर्षाची परंपरा राखत  ऊत्साहात साजरी केली. म्हसळा शहरांतून परंपरागत रिवाजा प्रमाणे  प्रत्येक हिंदू कुटुंबांच्या  घरी  देव पूजेत नारळाची पूजा केली जाते. सायंकाळी बहुतांश कुटुबातून हिंदू ग्रामस्थ अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे यांच्या नेतृत्वा खाली सामुहीक रीत्या नारळ वाजत गाजत तहसील व पोलीस कार्यालय जवळ आणले जातात. तेथे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनचा मानाचा नारळ सामील होतो व बंदरावर सामुहीक नारळ व जल पूजन होऊन नारळी पोर्णिमा साजरी केली. यावेळी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी  झळके, स.पो.नी. प्रविण कोल्हे, माजी सभापती महादेव पाटील, मंगेश म्हशील कर, सुरेश कुडेकर,नंदू गोविलकर, योगेश करडे, सुनील उमरटकर, विशाल सायकर, प्रकाश उर्फ बाबा करडे, अनिकेत पानसरे,बाबू बनकर, गौरव पोतदार, अनिकेत जैन असे विविध समाजाचे मान्यवर मिरवणुकीत सामील होते.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुमारे ४-५ माहिन्यानी  म्हणजे ३० जाने.१९४८ मध्ये "जंजीरा संस्थान" भारतात विलीन झाले. जंजीरा संस्थानचा तत्कालीन नबाब सिद्दी महामूद खान यानी केलेल्या तहनाम्यानुसार संस्थानातील मुरुड, श्रीवर्धन (तालुके)व म्हसळा महालांतील महसुल व पोलीस प्रशासनाचा "नारळी पोर्णिमा " या हिंदू सणांत सक्रीय सहभाग असावा असा आग्रह होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा