समाजातील प्रत्येक अपंग व्यक्तीला शासकीय सवलतीचा फायदा मिळाला पाहिजे - डॉ. अजित गवळी जिल्हा शल्यचिकित्सक

 

श्रीवर्धन तहसील कार्यालया कडून अपंग चिकित्सा शिबीराचे आयोजन 

श्रीवर्धन प्रतिनिधी मकसूद नजीरी
.
   रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने श्रीवर्धन सारखे कार्यक्रम पार पाडले तर शासनाकडे असणाऱ्या विविध योजना ह्या घरोघरी पोहचल्याशिवाय राहणार नाही.  त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचारी यांनासुद्धा काम करण्याचा उत्साह वाढत असतो.रायगड जिल्ह्यातील अधिकारी हे चांगले भेटले असून ते सर्वसामान्य जनतेत मिसळत आहेत.हे रायगडचे भाग्य आहे  .सर्वसामान्य व्यक्ती ने अधिकारी व वर्गाशी सवांद साधला तर आपल्या कामात असणाऱ्या अडचणी त्याच्याकडून समजू शकते. आणि त्यातूनच काहीतरी मार्ग काढून आपले काम आपण त्याच्याकडून पूर्ण करून घेऊ शकतो.असे प्रतिपादन जिल्हाशल्य चिकित्सक 
डॉ अजित गवळी यांनी श्रीवर्धन येथे आयोजित अपंग चिकित्सा शिबिरात केले .
    महाराष्ट्र शासनाने संजय गांधी योजनेमध्ये  अपंगाच्या बाबतीत सुधारित शासनादेश काढला आहे.त्यामध्ये अपंगाच्या वयाची अट शिथिल केली आहे.त्यामुळे अपंगांना शून्य वयापासून सुरू सवलती आहेत असे गवळी यांनी म्हंटले .सदर शिबारात श्रीवर्धन ,म्हसळा व तळा या तीन तालुक्यातून 350 अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळाले .तसेच अनेक अपंग व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आले.
यावेळी श्रीवर्धन प्रांताधिकारी प्रवीण पवार , तहसीलदार जयराज सूर्यवंशी, डॉ मधुकर ढवळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

रायगड चे जिल्हाधिकारी डॉ विजय सुर्यवंशी यांनी महसूल दिनी दिव्यांग चिकित्सा  शिबीर आयोजना संदर्भात सूचना दिल्या होत्या त्या नुसार आज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मध्ये जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.शासकीय योजनांचा फायदा प्रमाणपत्र धारकांना निश्चित होईल .
  जयराज सुर्यवंशी( तहसीलदार श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा