माणगाव -दिघी रस्ता प्रवासी वाहतुकीस योग्य होईपर्यंत अवजड वाहतुक बंद ठेवा : शिवसेना ; तसेच खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ सुरू करा



( संजय खांबेटे म्हसळा )
माणगाव - म्हसळा -दिघी या राष्ट्रीय महामार्ग  रस्त्यावर सुरू असलेली दिघी पोर्टची अवजड मालाचे वाहतुकी मुळे संपुर्ण रस्त्याला खड्डे पडले आहेत, प्रवासी वाहतुकीस रस्ता आयोग्य आहे. या सर्व गोष्टींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, M.S.R.D.C .व अर्थात  शासन पूर्णपणे दुर्लक्ष करते, शासन फेल ठरल्याचा दावा  जिल्हा प्रमुख खी मुंढे ,तालुका प्रमुख  नंदू शिर्के , माजी आमदार तुकाराम सुर्वे , सुजित तांदळेकर व अन्य पदाधिकाऱ्यानी करत आज म्हसळा शहरातील दिघी नाक्यावर सुमारे दोन तास निर्दशने केली.यावेळी अनंत कांबळे , महीला आघाडी प्रमुख रिमा महामुनकर ,रवींद्र लाड, अनिल महामुनकर, अमित महामुनकर, पांडुरंग बने, सचिन महामुनकर, शाम कांबळे, संतोष सुर्वे, गौरु कांबळे, दिपल शिर्के, प्रदीप शीतकर व सुमारे ४०० ते ५००  शिवसैनिक व फार मोठया संखेने महीला आंदोलनात सहभागी  होत्या . आम्ही सत्तेत असुनही आंदोलन नक्कीच करतोय याचा दुसरा अर्थ विरोधक निष्य प्रभ ठरले असा स्पष्ट होत आसल्याचे बहुतांश वक्त्यानी सांगत शासन दिघी पोर्टच्या ताटाखालील मांजर असल्याचे हिणवले, M.S.R.D.C. ची माणगांव -दिघी व्यतीरीक्त अन्य दोन ठीकाणी काम सुरू आहेत  इंदापूर-तळा- आगर दांडा व  वाकण- पाली- खोपोली ही दोनही कामे सुस्थींत आहेत तर माणगांव- दिघी हे काम सदोष आहे याचा नागरीकाना , पर्यटकाना  आर्थिक फटका व फारच त्रास होत आहे.आता शासनाने दिघी पोर्टचे कौतुक करू नये जनतेच्या मागणीकडे लक्ष द्यावे शिवसेनेचे पुढील आंदोलन ठोकाचे असेल याची नोंद घेण्याबाबत मुंढे  यानी महसुल व पोलीस प्रशासनाला सांगितले.



 सार्वजनीक बांधकाम चे उपअभियंता राऊत .सेक्शनल   इंजीनीअर जेथ्थे, शेटये.MSRDC चे उपअभियंता सचिन निकाडे यानी  २० ऑगस्ट पर्यंत खड्डे भरून नागरी वाहतुकीस योग्य आसा रस्ता करण्याचे आंदोलकांचे नेते खी मुंढे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, माणगाव ता. प्रमुख अनिल नवगणे, ता . प्रमुख नंदू शिर्के, रवी लाड याना.अश्वासन दिले .व  आंदोलनाची सांगता झाली.यावेळी श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार, म्हसळा तहसीलदार रामदास झळके , स. पो.नी. पविण कोल्हे, म्हसळा नगरपंचायतीचे मुं.का.अ.गारवे उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा