विशेष प्रतिनिधी,
स्वातंत्र्यदिन झेंडावंदन कार्यक्रम मु . देवघरकोंड ( ता म्हसळा ) येथील माजी सैनिक मा . श्री . शांताराम सुडकोजी गिजे यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पाडला. त्यांनी १९७१ रोजी झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धात उल्लेखनीय कामगिरी केली होती .
डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला होता व बांगलादेशची निर्मिती झाली होती. युध्दाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली होती, भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली होती.
श्री . शांताराम सुडकोजी गिजे यांच्या शौर्याची साक्ष देणारे पदक पाहून खूप अभिमान वाटते. आजच्या स्वातंत्र्यदिनी श्री . शांताराम गिजे साहेबांच्या कार्याला आणि शौर्याला म्हसळा लाईव्ह चा मनापासून सलाम .

Post a Comment