दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरात मोकाट घोड्यांचा सुळसुळाट झाला असून , रस्त्यांवरील पादचारी व वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते . रस्त्यांवर मोकाट सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या श्वानांच्या मालकांविरुद्ध ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे बोर्लीपंचतन गावातून जाणाच्या दिघी श्रीवर्धन मुख्य जिल्हा मार्गावर १ किमी . च्या भागात दिवसा घोड्यांचा उपद्रव असतो . रात्रीच्या वेळी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठाण मांडून असतात . त्यामुळे त्यांना धडकून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत . अनेक वेळा वाहतुकीचाही खोळंबा होतो . शहरात गेली अनेक वर्षे मोकाट गुरांचा उपद्रव होत असताना घोड्यांचीही संख्या वाढत असूनही त्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे . बोर्लीपंचतन शहर व लगतच्या गावातील काही व्यावसायिक रोजगार मिळविण्यापुरताच वापर करतात त्यानंतर या घोड्यांना पोसणे त्यांना परवडत नसल्याने ती मोकाट सोडून दिली जातात ही जनावरे दिवस - रात्र शहरात भटकत असतात . शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे भर रस्त्यात वारंवार जनावरांच्या धावाधाव होत असल्याने नागरिकांची धावपळ उडते . यामध्ये बेसावध पादचाऱ्यांना दुखापत झाल्याची अनेक घटना येथे घडल्या आहेत बोलपंचतन शहरातून जाणाऱ्या मार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असल्याने पादचाऱ्यांना उपद्रव सहन करावा लागतो . मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा , अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे
बोर्लीपंचतन शहरात सणासुदीला समस्या...
बोर्लीपंचतन मोठी बाजारपेठ आहे या समस्येवर ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेला प्रत्येक वेळी मोकाट जनावरांचा विषय घेतला जातो . पुढे अंमलबजावणी करण्यासाठी गावातून दवंडी पिटवून ग्रामपंचायत नोटीस फलकावर सूचना दिल्या जातात जनावरांच्या मालकांना सहकार्य करण्याचे सांगितले जाते . मात्र , सहकार्य मिळत नसून सिझननुसार व्यवसाय करून बोर्लीपंचतन शहर जनावरांना चरण्यासाठी रान असल्यासारखे सोडून द्यायचे असा घोडे मालकांचा नित्य नियम ठरलं आहे . यामुळे समस्येत वाढ होत आहे जनावरांच्या मालकांनी सहकार्य केल्यास मोकाट गुरांचा प्रश्न निकाली निघू शकतो , असे सरपंच गणेश पाटील यांनी सांगितले .
दुकानदारांना त्रास...
शहरातील भाजी, फळ विक्रेते यांना मोकाट जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे विक्रेत्यांचे लक्ष जरा इकडे तिकडे झाल्यास दुकानातील भाजी अथवा फळे या गुरांकडून फस्त होतात .

Post a Comment