श्रीवर्धन एसटी आगारातील कर्मचाऱ्यांची मनमानी : कोलमडलेले वेळापत्रक , उद्धट उत्तरांमुळे प्रवाशांमध्ये सताप


श्रीवर्धन : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवाशांच्या सेवेसाठी ' असे ब्रीदवाक्य अससलेल्या श्रीवर्धन एसटी आगारातील एसटी कर्मचार्यांच्या मनमनीपणा मुळे येथील प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत . कर्मचार्यांची मनमानी आणि गैरवर्तनामुळे प्रवासी चांगलेच संतप्त होत आहेत . एसटी बस सेवा वेळेवर न सुटणे , बसमध्ये अस्वच्छता नित्याचीच असून एसटी स्थानकामध्ये अस्वच्छतेचे दृष्य दिसते . इतर सोईसुविधांचाही अभाव आहे एसटी स्थानकाचे दुरुस्तीचे रेंगाळत काम सुरु असून स्थानकातील बसण्याचे जागेवर अस्वच्छता असते . अशा स्थितीत एसटीची वाट पाहत ताटकळत बसणे कंटाळवाणे आहे . तसेच येथील वाहक - चालक कर्मचारी तसेच कंट्रोलर , वाहतूक नियंत्रक यांचे प्रवाशांकडे उध्दट वागणे नित्याचेच ठरले आहे . कंट्रोलर कार्यालयातून दूरध्वनीवरुन माहिती घेण्यासाठी संपर्क केले असता दूरध्वनी हस्तक्षेप न करणे अथवा उष्ट उत्तर देणे किंवा चुकीची माहिती देणे असे प्रकार सुरू आहेत . येथील आगार व्यवस्थापक मुंबईहुन बागमांडले ही बस मुंबईहून आल्यानंतर ती बस पुढच्या फेरीकरिता न पाठविता अचानक रद्द करतात त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणारे अनेक विद्यार्थी , प्रवाशी यांना डेपोतच उतरविले जाते . यासंदर्भात तक्रार केली असता व्यवस्थापकांकडून त्याचे अधिकार आम्हाला आहेत , आम्हाला वरुन आदेश आहेत , असे उर्मटपणे सांगतात . प्रवाशांची तक्रार ऐकून न घेता तुम्हाला जी तक्रार करायची असेल ती करुन घ्या , अशीही उत्तरे प्रवाशांना दिली जातात . कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी हैराण झाले असून , तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत तक्रार बुकामध्ये तक्रार केली असता तक्रारींचे उत्तरी मिळत नाही . श्रीवर्धन हे पर्यटनक्षेत्र असून आगार व्यवस्थापक , एसटी कर्मचारी यांच्या या मनमानीमुळे प्रवासी , विद्यार्थीवर्गाचे प्रचंड नुकसान होत असल्याने , ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा