( प्रतिनिधी म्हसळा )
खालापुर टोल नाक्याजवळ बिघडलेल्या अवस्थेत उभ्या असणाऱ्या ट्रेलरला क्रृझर या गाडीने मागुन टक्कर देत अपघात झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ :३० च्या सुमारास घडली होती. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा गावाचे पोलिस पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. म्हसळा तालुक्यातून खाजगी प्रवासी वाहतुक करणारी एमएच ०६ बीई १२४१ या क्रमांकाची क्रृझर म्हसळा येथून प्रवासी घेऊन मुंबई येथे जात असताना य खालापुर टोल नाक्याजवळ चालकाच्या लक्षात न आल्याने तेथे पहिले पासुन बंद असलेल्या एका ट्रेलर ला मागुन धडक दिली. धडक एवढी भिषण होती की,क्रृझरचे संपुर्ण नुकसान झाले असुन गाडीमध्ये असणारे तिन जण गंभीर जखमी झाले व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते.जखमीना तातडीने वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी यामधील जखमी सुभाष बागवे (वय ३८ वर्ष ) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सुभाष हा म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा गावाचा पोलिस पाटील होता. सुभाषच्या अपघाती मृत्यूमुळे संपुर्ण म्हसळा तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.

Post a Comment