म्हसळा प्रतिनिधी
शिक्षण महर्षी डॉ . बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षात येणारा आज बुधवार दिं .८ ऑगस्ट रोजी चा डॉ . बापूजी साळुंखे यांचा
पुण्यतिथी कार्यक्रम म्हसळयातील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कुल व ज्युनी . कॉलेजमध्ये अतीशय दिमाखदार संपन्न झाला . तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष व स्थानिक कमेटीचे सदस्य सुभाष उर्फ बाळशेठ करडे यांचे हस्ते डॉ . बापूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्युनी. कॉलेजचे प्राचार्य बामणे सर, पर्यवेक्षक महामुलकर सर व विद्यार्थानी डॉ बापूजींच्या जिवनक्रम , विविध अंग व आपला पुर्ण देह व संसार शिक्षण चळवळीसाठी कसा त्याग केला होता ह्याची परीपूर्ण माहीती दिली. यावेळी बँड , ढोल, लेझीम व झांज पथकासह संपूर्ण शहरांत बापूजींच्या सजावलेल्या रथासह शोभा यात्रा काढली. कार्यक्रमासाठी प्रा. प्रेम बोराटे, नितीन कदम,पडीयार सर, प्रसाद डोंगरे, दिपक सुर्यवंशी, शेटे मॅडम, सचिन गायकवाड व ज्युनी कॉलेजच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीनी विशेष मेहनत घेतली

Post a Comment