दांडगुरी : प्रतिनिधी
श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापतीपदी मीना गाणेकर तर उपसभापती पदी बाबुराव चोरगे यांची बुधवारी , ता ७ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली . श्रीवर्धन पंचायत समितीमध्ये चार पंचायत समितीपैकी तीन सदस्य हे सेनेचे असून एक सदस्य राष्ट्रवादीचा आहे ठरल्याप्रमाणे सुरुवातीला सव्वा वर्षासाठी सुप्रिया गोवारी सभापती पदी होत्या त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी राजीनामा दिल्याने सभापतीपदी मीना गाणेकार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापती पदी बाबुराव चोरगे यांची निवड जाहीर झाली . सध्या श्रीवर्धन पंचायत समितीत तीन सदस्य शिवसेनेचे असून राष्ट्रवादीचे एक सदस्य बळ आहे सभापती गानेकर यांची निवड पुढील सव्वा वर्षासाठी असेल . या वेळेस निवडणूक कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रतोष कोळ्थरकर, उप तालुका प्रमुख सुकुमार तोडलेकर , माजी सभापती सुप्रिया गोवारी , जिल्हा परिषद सदस्य सायली तोडलेकर , उप जिल्हा प्रमुख शामकांत भोकरे , बोर्लीपंचतन माजी सरपंच निवास गाणेकर , सुरेश माडवकर कुमार गाणेकर , मारुती बीचारे युवा सेना तालुका अधिकारी संदेश म्हसकर , शाखा प्रमुख नदू भाटकर , शंकर गाणेकर , मनोहर परकर , सागर करदेकर , रामचंद्र गाणेकर , कुणाल पेडनेकर , ओमकार गाणेकर , प्रगती इंदुलकर , छकुली गाणेकर , हेमांगी रेळेकर उपस्थित होते .

Post a Comment