दिवेआगर गावातील रस्ते झाले चिखलमय...


प्रतिनिधी : बोर्लीपंचतन
निळाशार नितांत स्वच्छ समुद्र किनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे त्यामुळे वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी - विदेशी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दा पहायला मिळते . मात्र , इथल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे . त्यामुळे गाडी सोडा बैलगाडी चालवणेदेखील जिकरीचे ठरत आहे . गावाच्या प्रवेशाजवळ असलेल्या आदर्श सांसद गल्ली क्र . १ चा बट्ट्याबोळ उडालेला दिसतोय स्थानिक व पर्यटकांना चिखलमय रस्त्यांच्या खड्ड्यांतून जावे लागते . यारस्त्यावरून जाताना समुद्रातील बोटीने प्रवास केल्याचा भास होतो . रस्त्यावर अगणित खखड्डे चिखलयुक्त पाण्याने भरलेले पाहायला मिळतात . यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन समुद्रालगत जोडणाच्या रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी अशी स्थानिकांची मागणी आहे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ' हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ . विकासाच्या नावाने गेल्या पंधरा वर्षात शासनाने येथे कोट्यवधी खर्च केलेत मात्र अद्यापही अनेक विकासकामे अपूर्ण आहेत . सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत ही विकास काम होत आहेत . कित्येक अधिकारी बदलून गेले तरी कामे अद्यापही अपूर्णच राहिली आहेत . बैलगाडी जाण्यामुळे या रस्त्यावर खड़े बनत आहेत . पावसाळा संपताच ग्रामपंचायत निधीतून रस्ता करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा