श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त म्हसळा येथे काढण्यात आलेल्या दिंडीत सहभागी शिंपी समाज बांधव.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा येथील नामदेव शिंपी समाज यांच्या विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 668 वा समाधी सोहळा श्री संत नामदेव महाराज मंदिरात संपन्न झाला.समाधी सोहळ्यानिमित्त सकाळ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नामदेव महाराज मंदिरापासून ते संपूर्ण शहरभर श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची दिंडी भजन-किर्तनाच्या गजरात, टाळ-मृदुगांच्या तालासुरात काढण्यात आली. दिंडी राधाकृष्ण मंदिरात विसर्जन करून नामदेव महाराजांची विधिव्रत महापूजा करण्यात आली. शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गूणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी म्हसळा नामदेव शिंपी समाज अध्यक्ष दादा पानसरे, संजय पाटकुले, अमर करंबे, डॉ.अजित सुकाळे, कुंभार समाज अध्यक्ष सुनील अंजर्लेकर, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, कमलाकर करडे, सुनील उमरोठकर,संतोष पानसरे,दिलीप करंबे,गौरी पोतदार ,प्रसाद करंबे,गजानन करंबे,महेंद्र ढवळे, संजय करंबे,वैष्णवी करंबे,मंदाकिनी करंबे,मालती करंबे,अनिल पोतदार,शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के,प्रभाकर करंबे, हिंदू समाज माजी अध्यक्ष सुरेश करडे,हिंदू समाज उपाध्यक्ष नंदकुमार गोविलंकर, कुंभार समाजाचे संतोष कुडेकर, भाजपाचे मंगेश म्हशिलकार,मंगेश हेंगिष्टे आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी श्री संत नामदेव महाराजांच्या जीवनावर आधारीत माहिती सांगीतली. महाप्रसादानंतर महिला मंडळाचे सुस्वर कीर्तन-भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Post a Comment