संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटल बिहारी बाजपेयी यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन व अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम आज शुक्रवार दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी दु. १२ वा. सार्वजनिक वाचनालय , म्हसळा येथील हॉलमध्ये भा. ज.पक्षातर्फ ठेवण्यात आल्याचे भाजपाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुका अध्यक्ष शैलश पटेल व शहर अध्यक्ष मंगेश मुंडे यानी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांत कळविले आहे.अस्थिकलशा समवेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,जिल्हा पदाधिकारी कृष्णा कोबनाक, विष्णू भाई पाटील, राजेंद्र राऊत, महेश मोहिते, संजय कोनकर, सतीष धारप, राजेश मपारा, असे अन्य पदाधिकारी येणार आहेत. श्रध्दांजली सभेला सर्व पक्ष, राष्ट्रप्रेमी नागरीक व तालुक्यांतील सर्व समाजाचे मंडळीना आमंत्रण आसल्याचे आयोजकानी सांगितले.

Post a Comment