नगरपालिकेची विद्यार्थी गणवेश व साहित्यसाठी 4 लाख 20 हजाराची रुपयांची तरतूद..
विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आदर्शवत आहे
अनिकेत तटकरे (विधानपरिषद आमदार )
श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
आधुनिक स्पर्धेच्या युगात विदयार्थी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या शाळेत होणारे ज्ञानदान भावी पिढी घडवण्यात निश्चित महत्वाची भूमिका बजावत आहे यांचा सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन अनिकेत तटकरे यांनी केले .
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सात शाळेच्या विदयार्थ्यांना शालेय गणवेश व उपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम शाळा नंबर एक मध्ये आयोजित करण्यात आला होता .त्या प्रसंगी अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले .आपल्या मनोगतात त्यानी श्रीवर्धन तालुक्यातील नगरपालिकेच्या शाळेच्या प्रगती संदर्भात समाधान व्यक्त केले. शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा सुजान नागरिक बनावा त्या दृष्टीने त्यास शिक्षण मिळणे अगत्याचे आहे .विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सोई सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला हे स्तुत्य आहे.खेळाचे मैदान, स्वच्छ पाणी, आसन व्यवस्था, भव्य इमारत व दर्जेदार शिक्षण यांची पुर्तता नगरपालिका प्रशासनाने केली आहे .आज नगरपालिका शाळेत 547 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही आनंदाची व जबाबदारीचे काम आहे .प्रत्येक शिक्षकाने आपल्या आदर्शवत वागणुकीतून व सर्वंकष ,सर्वांगीण शिक्षणा द्वारे विदयार्थ्यांचा विकास घडवणे अभिप्रेत आहे. शाळेतील शिक्षक कमतरतेवर शैक्षणिक अहर्ता प्राप्त व्यक्तींची तात्पुरत्या कालावधी साठी नेमणूक करण्यात यावी असे तटकरे यांनी आपल्या मनोगतात म्हंटले .
नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने यांनी आपल्या मनोगतात मराठी शाळा इंग्रजी शाळेच्या तुलनेत निश्चितच चांगले काम करत असल्याचे सांगितले .त्यामुळे प्रत्येक पालकांसाठी ही अभिमानाची बाब आहे असे नमूद केले.नगरसेवक बबन चाचले यांनी शिक्षक कमी असल्याचे सांगितले. नवीन शाळा समिती स्थापन झाल्यामुळे नगरसेवकांच्या ताब्यात शाळा गेल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी नगरसेवक दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, अनंत गुरव, राष्ट्रवादी पदाधिकारी अविनाश कोळबेकर, ऋतुजा राजेंद्र भोसले, गणेश पोलेकर व नगरपालिका मुख्याधिकारी रविकुमार मोरे प्रमुख अतिथी उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता गुरव यांनी केले.


Post a Comment