म्हसळा तालुक्यात भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, मुख्य शासकीय भव्यदिव्य कार्यक्रमात तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते ध्वजारोहण


म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यात भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये मुख्य शासकीय कार्यक्रम अगदी भव्यदिव्य स्वरूपात म्हसळा शहरातील कन्याशाळा मैदानात पार पडला, याप्रसंगी म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी म्हसळा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल , अंजुमन ए इस्लाम , आयडियल इंग्लिश स्कूल , रा.जी.प. शाळा म्हसळा नं. १, रा.जी.प. उर्दू स्कूल, शायीन उर्दू स्कूल, एस.जी.के. स्कूल या शाळा सामावेत वसंतराव नाईक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमात म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसहित राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी म्हसळा तालुका वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे म्हसळा शहरातील विविध शासकीय कार्यालयात ध्वव्जारोहण झाले यामध्ये म्हसळा पंचायत समितीचे ध्वजारोहण नवनिर्वाचित सभापती छाया म्हात्रे यांच्या हस्ते, म्हसळा पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते, म्हसळा नगरपंचायत चे ध्वजारोहण नगराध्यक्षा फलकनाझ हुर्झूक यांच्या हस्ते, सार्वजनिक वाचनालयाचे ध्वजारोहण संजय खांबेटे यांच्या हस्ते, रा.जी.प. शाळा म्हसळा  नं. १ चे ध्वजारोहण सुशील यादव यांच्या हस्ते, न्यू इंग्लीश स्कुल चे ध्वजारोहण प्राचार्य बी . एन . माळी यांच्या हस्ते पार पडले याच प्रमाणे तहसील कार्यालय, कृषी विभाग, महावितरण, सार्वजनिक डाक विभाग, कस्टम ऑफिस यांच्यासमवेत अनेक शाळा , महाविद्यालये  येथे ध्वजारोहण करण्यात आले. यातील बहुतेक कार्यक्रमात म्हसळा शहरातील तसेच तालुक्यातील मान्यवर व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा