संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
माणगाव - म्हसळा -दिघी या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सुरू असलेली दिघी पोर्टची अवजड मालाचे वाहतुकी मुळे संपुर्ण रस्त्याला खड्डे पडले आहेत, प्रवासी वाहतुकीस रस्ता आयोग्य आहे. या सर्व गोष्टींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, M.S.R.D.C .व अर्थात शासन पूर्ण पणे फेल ठरल्याचा दावा तालुका प्रमुख नंदू शिर्के व अन्य पदाधिकाऱ्यानी आज शिवसेना कार्यालयांत घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केला . उद्या भारतीय स्वातंत्र दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या मुहुर्तावर आमचे जन आंदोलन व रस्ता रोको निश्चित आसल्याचे सांगितले. यावेळी अनंत कांबळे ,रवींद्र लाड, अनिल महामुनकर, अमोल पेंढारी, अमित महामुनकर, पांडुरंग सुतार, सचिन महामुनकर, शाम कांबळे, संतोष सुर्वे, गौरु कांबळे, दिपल शिर्के, प्रदीप शीतकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी होते. आम्ही शिवसेना , युवासेना , अवजड वाहतुक सेना या संघटना नी यापूर्वीही शासनाला व दिघी पोर्ट- पास्को याना सनदशीर मार्गाने निवेदन दिले होते आता आमचा निर्णय पक्का आहे. संपुर्ण रस्ता प्रवासी वाहतुकीस योग्य होई पर्यंत अवजड वाहतुक १०० % बंद , खड्डे बुजवून वाहतुक सुरु केल्यास रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुक सुरु ठेवावी, ओव्हरलोड, वेग मर्यादा या प्रमुख मागण्यांची पूर्तता होई पर्यंत वाहतुक बंद हा आमचा निर्धार राहील.
सेनेने आंदोलनाची वेळ व मार्गावरील ठीकाणांचा खुलासा केला नाही.
उद्या भारतीय स्वातंत्र दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी तालुका मुख्यालय व प्रत्येक गावांतुन ध्वजारोहणासह विविध सांस्कृतीक कार्यक्रम असताना शिवसेनेने आंदोलन स्थगीत ठेवावे अशी आयोजकाना विनंती केली आहे.
प्रविण कोल्हे , स. पो.नी. म्हसळा




Post a Comment