प्रतिनिधी
मैत्री फाउंडेशन मु. मलई कोंड ता. माणगांव, जि. रायगड च्या सेवाभावी संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाईंदर पूर्व येथील प्रशिक मतिमंद शाळेत जाऊन येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप व खाऊ देण्याचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी मी मुंबईकर प्रख्यात समाजसेवक श्री सचिन डोंगरे, समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल रानवडे, अशोकभाई सकपाळ, राष्ट्रवादी म्हसळा तालुका प्रमुख श्री रविंद्र तटकरे, श्री चंद्रकांत सावंत- कुणबी समाज बावीशी विभाग मढेगाव उपाध्यक्ष, मैत्रीच्या महिला सौ सुशीला मनवे, स्नेहा बामणे तसेच फाउंडेशन चे सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बनसोडे मॅडम शिक्षिका व त्यांच्या मदतनीस यांनी आम्हाला सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मैत्री फाउंडेशन आपले आभार आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment