शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्तीकलश हरीहरेश्वर येथे विसर्जित



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
देशाच्या सिमीचे रक्षण करतांना  अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या अस्तिकलाशचे विसर्जन दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वर येथे करण्यात आले .संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याऱ्या सुपुत्राला 8 ऑगस्ट ला वीर गती प्राप्त झाली .हरिहरेश्वर मध्ये शहीद राणे यांच्या अस्तिकलाशचे  त्यांच्या परिवाराने सश्रूंनयनाने  धार्मिक विधी पार पाडत विसर्जन केले.मेजर राणे तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना देशाचे रक्षण करतांना शहीद झाल्या मुळे पुर्ण देश हळहळला आहे .त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा  , भाऊ व आई वडील असा परिवार आहे .आज अस्तिविसर्जनासाठी संपुर्ण परिवार हरिहरेश्वर मध्ये आला होता . अस्तिविसर्जनासाठी  पत्नी कनिका राणे ,मुलगा अगस्त्य राणे ,आई ज्योती राणे वडील प्रकाश राणे, सासरे हरिलाल मानेकर सासू बरखा मानेकर मेव्हणा ,विदित मानेकर काका प्रताप राणे काकी स्वाती राणे चुलत भाऊ ओंमकार राणे मावस भाऊ आदित्य हेदवळकर मामा नरेंद्र जाधव मामा मंगेश सावंत . स्थानिक मंडळी सुयोग लांगी , सचिन गुरव , जितेश भोसले व  अनेक तरुण उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा