म्हसळा प्रतिनिधी : अरुण जंगम
महाराष्ट्रातील दळणवळणात महत्वाची भुमिका बजावणारी एस टी आधुनिकीकरणाची कास पकडत मार्गक्रमण करताना दिसत आहे. परंतु हे मार्गक्रमण एस टी कर्मचारी व जनता यांना त्रासदायक ठरू लागले आहे . आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना सुखकारक प्रवास व सोई सुविधा मिळणे अपेक्षित होते.परंतु वाहकाकडील ट्रायमॅक्स मशीन व शिवशाही दोन्ही घटक त्रासदायक ठरत आहे.
श्रीवर्धन एस आगारात दाखल झालेल्या शिवशाही बसेस सदैव अस्वच्छ असतात .आगारात दोन खाजगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत त्यामुळे त्यांच्या मध्ये समनव्य नसतो .शिवशाही बसेस वर कामगिरी बजावणाऱ्या चालकास अतिशय कमी दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे .त्यामुळे अपघाताची सदैव भीती प्रवासाच्या मनात असते.दररोज एक तरी शिवशाही काही तरी कारणास्तव रद्द केली जाते .विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाशांच्या हितासाठी चालू केलेली सेवा विनाकारण सर्वसामान्य माणसाला त्रास दायक ठरत आहे .शिवशाही संदर्भात एस टी अधिकारी व्यवस्थित उत्तरे देत नाहीत .
एस टी महामंडळात वाहका कडील ट्रायमॅक्स मशीन सदैव समस्यांनी ग्रासलेले असते .बॅटरी उतरणे , मशीन बंद पडणे, प्रिंट खराब येणे ,मशिनची बटणे तुटलेली असणे ही नित्याची बाब झाली आहे .त्यामुळे वाहकावर मानसिक त्रास निर्माण होत आहे. पर्यायाने प्रवाशी व वाहक यांच्या मध्ये नित्याचे वादविवाद झडत आहेत. एस टी चे वाहक सुद्धा सदरच्या तिकीट मशीन ला प्रचंड त्रासले आहेत .परंतु ट्रायमॅक्स कंपनी व एस टी चे वरिष्ठ अधिकारी त्या कडे दुर्लक्ष करत आहेत..करोडो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे तिकीट मशीन महामंडळाने कसे खरेदी केले असा प्रश्न जनता विचारात आहे .
महामंडळातील आधुनिकीकरणातील महत्वाचा घटक असलेली स्वच्छता परिक्षणाचा मुद्दा ठरत आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगाराच्या स्वछते साठी लाखो रुपये महिन्याला एस टी महामंडळ खर्च करत आहे .परंतु एस टी डेपोत स्वछता कुठेच आढळत नाही. एस टी स्टँड ,कर्मचारी विश्रांती गृह, प्रवाशी स्वछता गृह येथे कुठेच स्वछता दिसत नाही .पर्यायाने महामंडळाने खर्च केलेला पैसा गेला कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे.
वाहका कडील ट्रामॅक्स मशीन दुरुस्ती , स्टँड ची स्वछता ,शिवशाही बसेस ची निरंतर सेवा अगत्याचे आहे . या सर्व बाबी विद्यमान परिवहन मंत्री यांच्या कार्यभाग स्वीकारल्या नंतर सुरू झाल्या आहेत.परिवहनमंत्री यांनी आधुनिकरणास चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
आज रोजी रायगड जिल्ह्यात एस टी महामंडळाचे आठ डेपो आहेत .रायगड जिल्ह्यात अंदाजे जवळपास 1100 कर्मचारी महामंडळात कार्यरत आहेत. चालक ,वाहक व यांत्रिक यांची संख्या जास्त आहे.
----------------------------------------------------
रायगड जिल्ह्याच्या ज्या आगारातील वाहकांच्या तिकीट मशीन बाबत तक्रार मिळेल त्या आगाराची अधिका-यांकडुन चौकशी करण्यात येईल व वाहकांनी सदर तिकीट मशीन बंद पडल्यास सोबत असणा-या तिकीट ट्रे मधुन तिकीट देणे बंधनकारक आहे तसे तक्रार असलेल्या आगारातुन वाहकांकडुन होते किंवा नाही याची देखील चौकशी केली जाईल
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक पेण , रायगड
आगारामध्ये कामकाज संपल्यानंतर सर्व वाहकांकडुन तिकीट मशीन जमा होतात व पुन्हा चार्जींग साठी लावल्या जातात काही दिवसांपुर्वी आलेल्या परिपत्रकानुसार सदर मशीन कीती वेळ चार्जींग साठी लावले होते याची माहीती घेतली जात होती मात्र कालांतराने सदर मशीन्स रात्रंदिवस चार्जींग साठी लावल्या जात असल्याने असणारी बँटरी अती चार्जींगने साहजीक खराब झाली असल्याने या मशीन्स वारंवार बंद पडत आहेत -प्रकाश टेकाले, वाहक श्रीवर्धन आगार
सदर तिकीट मशीन्स जुन्या झाले असल्याकारणामुळे तसेच खराब वातावरणामुळे काही वेळेस तिकीट रक्कम मशीन मध्ये जंमा होते परंतु तिकीटावर काहीही छापुन येत नाही पर्यायाने त्याच तिकीटावर सदर वाहकास टप्पा व रक्कम लिहुन द्यावी लागते मात्र मशीन पुर्ण पणे बंद पडल्यास सोबत असणा-या पारंपारीक तिकीटांमधुन सदर वाहकांनी तिकीट देणे बंधनकारक आहे. सदर बाबतीत याची पुर्तता होते किंवा नाही याची चौकशी केली जाईल "
-रेश्मा गाडेकर, आगार प्रमुख श्रीवर्धन आगार

Post a Comment