श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
मराठी अस्मितेला देशाच्या कानाकोपऱ्यात सन्मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या स्मारकाची त्यांच्या जन्म गावी अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. स्मारका च्या प्रांगणात गवत व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले .मात्र नगरपालिका प्रशासनाने त्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पर्यटक निधीतून नगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाभरात 2 लाख 34 हजार 285 रुपये जमा झाले आहेत. परंतु पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या स्मारका कडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनांस येत आहे.राज्य सरकारने स्मारक जीर्णोद्धारासाठी तत्वतः 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. श्रीवर्धन नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा। झाल्याचे वृत्त आहे . पेशवे स्मारकाची जागा नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या ताब्यात आहे .प्राप्त माहिती नुसार नगरविकास ;पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्या समन्वयातून पेशवे स्मारकाचे नूतनीकरण होणार आहे .श्रीवर्धन मध्ये 1988 साली पेशवे स्मारकाची उभारणी केली होती तत्कालीन विधान परिषद सभापती जयंत टिळक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते . बाळाजी पेशव्यांचा पूर्णाक्रुती पुतळा व चार खोल्याचे सभागृह बांधले होते .त्या नंतर आज पर्यंत कुठलेही नवीन बांधकाम करण्यात आले नसल्याचे समजते. आज रोजी स्मारक परिसरात सर्वत्र गवत वाढले आहे. शहरातील भटक्या श्वानाचा संचार स्मारकाच्या प्रांगणात झालेला आहे. स्मारकाच्या वास्तु ला दोन प्रवेशद्वार होते त्या मधील एक कमीनीचे प्रवेशद्वार धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाल्या कारणे गेल्या वर्षी नगरपालिका प्रशासनाने कमानीचा वरचा ढाच्या जमीन दोस्त केला आहे.व दुसरे प्रवेशद्वाराची एक बाजू तुटली आहे त्या कारणे शहरातील भटकी जनावरे, श्वान यांचा स्मारकाच्या परिसरात सदैव विना अडथळा सर्वत्र संचार झाला आहे. स्मारकाच्या चार ही बाजूस गवताचे वाढ झाली आहे .
तसेच बांधण्यात आलेल्या जुन्या चारही खोल्याची अवस्था बिकट झाली आहे. कौलारू असलेल्या वास्तूच्या उजव्या बाजूस असलेल्या खोल्याचे दरवाजे तुटले आहेत .मध्यभागी असलेल्या मुख्य खोली मध्ये शहरातील विदयार्थी वर्गासाठी विविध उपक्रमाचे आयोजन निरंतर केले जाते त्या कारणे सदर ची खोली सुव्यवस्थित असल्याचे दिसून येते. डाव्या बाजूस असलेली खोली सदैव बंद आहे .पेशव्यांच्या पुतळ्याचा रंग जात असल्याचे दिसून येत आहे .
पेशवे स्मारकाच्या संरक्षक भिंतीस विविध ठिकाणी तडे गेले आहेत .स्मारकाच्या समोरील प्रवेशद्वाराची कमान तोडल्या पासून स्मारक परिसरास भग्न अवस्था प्राप्त झाली आहे.श्रीवर्धन शहरात लाखो रुपये खर्च करून सी सी टीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत परंतु पेशवे स्मारक त्यास अपवाद ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकार कडून तत्वतः मंजूर झालेला निधी प्राप्त होई पर्यंत नगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या उपलब्ध मनुष्य बळाचा योग्य वापर करून साधारणतः स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा श्रीवर्धन मधील नागरिक बाळगत आहेत .
श्रीवर्धन चे रम्य निसर्ग सौंदर्य पर्यटकांस साद घालत आहे.त्यामुळे श्रीवर्धन मध्ये पर्यटनास चालना मिळाली आहे .श्रीवर्धनला चौफेर समुद्र किनारा लाभला आहे .जीवना बंदर ,सोमजाई मंदिर ,जीवनेश्वर मंदिर व पेशवे स्मारक ही पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रे आहेत.
पेशवे स्मारकाची नियमित स्वछता केली जाते .श्रीवर्धन मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे .स्मारकाच्या परिसरात निर्माण झालेले गवत तत्काळ काढले जाईल .
नरेंद्र भुसाणे (नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद )
पेशवे स्मारक नूतनीकरण हा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे श्रीवर्धन च्या पर्यटनाचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे .
वसंत यादव (पर्यटन सभापती श्रीवर्धन नगरपालिका )
नगरपालिकेच्या स्वछता विभागास पेशवे स्मारक स्वछतेचे निर्देश दिले आहेत .पर्यटनाच्या दृष्टीने पेशवे स्मारक महत्वाचे आहे.स्मारक स्वछता तात्काळ केली जाईल .
रविकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )
पेशवे स्मारक हे मराठी अस्मितेचे प्रतीक आहे .त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून लोक स्मारकास भेट देतात .नगरपालिकेने नियमित स्वछता करणे गरजेचे आहे.
उदय आवळस्कर (रहिवाशी पेशवे आळी श्रीवर्धन )





Post a Comment