कर्लास गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित : श्रीवर्धन तालुक्यातील कर्लास गावात उघडया डिप्या , गंजलेले खांब, कुजलेल्या विद्युत वाहिन्या ठरत आहेत धोकादायक.




सर्फराज दर्जी : बोर्ली पंचतन
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने श्रीवर्धन तालुक्यातील कर्लास गावात बसविलेली डीपी भंगार झाली आहे. परिणाम फ्यूज उडणे आदी प्रकारांमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. 
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या डिप्यांची देखरेख-दुरुस्ती होत नसल्यामुळे त्यांची स्थिती वाईट झालेली आहे.  रोहित्रांवर सुद्धा  विजेचा भार जास्त असल्याने,  कमी दाबाचा विज पुरवठा होत आहे. यामुळे विद्युत ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या ग्रामीण भागात विद्युत डिप्यांनची दुरवस्था झालेली असून, पावसाळ्यात यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत रोहित्रांवर बसविण्यात आलेले अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर आहेत तसेच अनेक ठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तात्पुरत्या तारा टाकल्या जातात. यामुळे भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच दिघी परिसरातील अनेक गावांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गंजलेले खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या आणि यावर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे वीज पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यापूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी कर्लास गावातून अनेक वेळा केली गेली असून
महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष होत असते.
 कर्लास गावात  विद्युत पुरवठा होऊन कित्येक वर्षे लोटली तरी महावितरण कंपनीकडून केवळ वीजबिल भरमसाठ आकारण्या व्यतिरिक्त कोणतेही आधुनिक बदल केलेले नाहीत किंवा कोणतीही सुधारणा केलेली दिसून येत नाही. कित्येक वर्षापूर्वी घालण्यात आलेले लोखंडी खांब बदलण्यात आले नसल्याने ते आता गंजले आहेत. कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहेत तर विद्युत वाहिन्याही जुन्या 45 वर्षाच्या पुर्वी बसवण्यात आल्याने त्या वारंवार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोकाही वाढला आहे.कर्लास गावात अद्याप कित्येक  वर्षापूर्वी घालण्यात आलेले लोखंडी खांब आजही वाकलेल्या स्थितीत पहायला मिळत आहेत. दोन लोखंडी खांबामधील अंतर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने आणि वीज कर्मचाऱ्यांकडून योग्यवेळी त्याची देखभाल होत नसल्याने सद्यस्थितीत गावात अनेक ठिकाणी वाहिन्या लोंबकळताना दिसत आहेत. विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यातून गेल्या आहेत; मात्र याकडे महावितरण कंपनीचे कर्मचारी डोळेझाक करत आहेत. दिघी भागातील महावितरण कंपनीचे कर्मचारी महिन्यात  10 दिवस कामावर हजर तर  20 दिवस रजेवर असतात यामुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत , अशी तक्रार कर्लास गावातील ग्रमस्थांनी पत्रकार सर्फराज दर्जी यांच्याकडे केली. 

एक इकडे भारताचे पंतप्रधान डिजीटल इंडिया बनवण्याच्या मागे आहेत आणि दुसरीकडे दिघी परिसरातील अनेक दिघी,कुडगाव,कर्लास,नानवेली,सर्वा,हर्वित ठिकाणी 40 ते 45 वर्षा पुर्वी वापरलेले विद्युतीकरणाचे साहित्य आजही बदललेले गेलेले नाही.यामुळे पावसाळ्यात किरकोळ वादळी वाऱ्यातही  विद्युत वाहनय होताना दिसत आहे. वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांकडून दामदुप्पट वीज बील आकारले जात असतानाही वीज यंत्रणेतील डागडुजीवर त्या प्रमाणात खर्च होताना दिसत नाही. त्यामुळे गावागावातील वीज पुरवठा धोकादायक बनला आहे. वारंवार खंडीत होणारा वीज पुरवटा सुरळीत करण्याबाबत महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाळा तोंडावर  येतो तरीही कामे पावसाळ्यापूर्वी गर्जाची कामे होत नाहीत , 
अनेक वेळी कर्लास गावातील ग्रमस्थांनी श्रीवर्धन महावितरणच्या कार्यालयात उघड्या डिप्यांन वर झाकण ठेवावे अशी तक्रार  करण्यात आली तरीही महावितरण कंपनीकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही.पावसाळयात ह्या उघडया डिप्यांन मुळे अनेकदा जंप्पर उडत राहतो व ज्या ठिकाणी हि डिपी उघडी टाकली गेली आहे, तिथे जोरदार पावसाने पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण गावात शाॅट सर्किट होण्याची शक्यता आहे,तरी आगामी काळात येणाऱ्या गणपतीच्या सणा अगोदर गंजून  तुटण्याच्या अवस्थेत असलेले विद्युत खांब आणि कुजलेल्या विद्युत वाहिन्या बदलून व झेपावलेली झाडे व फांद्या तोडून  विद्युत प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी कर्लास गावातील ग्रामस्थ करत आहेत, कारण प्रतेक वर्षी कुजलेल्या विद्युत वाहिन्या  खाली पडून अनेक वेळी तेथील  शेतकऱ्यांची गुरे चिकटून मरण पावली आहेत. यापुढे जर का हे 45 वर्ष पुर्वीच्या  कुजलेले विद्युत वाहिन्या व गंजून  तुटण्याच्या अवस्थेत आलेले  खांब जर का बदलले गेले नाहीत तर, मनुष्याच्या जीवाची हानी टाळली जाऊ शकत नाही .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा