श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धन येथील पेशवेआळी येथे पेशव्यांचे जन्मस्थान आहे . महाराष्ट्राच्या इतिहासात पेशवाईच्या पराक्रमाची महान गाथा आहे . त्यांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी भव्य स्मारक व्हावे ही सगळ्या श्रीवर्धन वासियांची इच्छा आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन येथील पेशवे स्मारकासाठी १९ कोटी रुपयांच्या निधीसाठी तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर झाले मात्र याला १ वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला सुरुवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे . श्रीवर्धन शहराची ओळख प्रामुख्याने सांगितली जाते ती पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची जन्मभूमी म्हणून . भट कुटुंबीय मुळचे दिवेआगरचे , त्याकाळी श्रीवर्धन , म्हसळा व मुरुड या तीन तालुक्यांचे जंजिरा संस्थान अस्तित्वात होते . संस्थानिक नवाबाने भट कुटुंबियांकडे श्रीवर्धनची देशमुखी सोपविली होती . त्यामुळे भट घराणे श्रीवर्धन येथे वास्तव्यास होते . पुण्यामध्ये मराठेशाही डळमळीत होत असताना शाहू महाराज व बाळाजी विश्वनाथ यांची ओळख झाली . बाळाजी यांचे व्यक्तिमत्व व मुत्सद्देगिरी पाहून शाहू महाराजांनी त्यांना मराठेशाहीच्या पहिल्या पेशवे पदाची सुत्रे बहाल केली . बाळाजी विश्वनाथ यांचे थोरले चिरंजीव पहिले बाजीराव यांनी आपल्या पराक्रमाची छाप संपूर्ण भारतवर्षावर पाडली . महाराष्ट्राबाहेर दिल्लीच्या तख्तावर व अटकेपार झेड़ा रोवला . श्रीवर्धन येथील पेशवेआळी येथे पेशव्यांचे जन्मस्थान आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पेशवाईच्या पराक्रमाची महान गाथा आहे . त्यांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी भव्य स्मारक व्हावे ही , सगळ्या श्रीवर्धनवासियांची इच्छा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन येथील पेशवे स्मारकासाठी १९ कोटी रुपयांच्या निधीसाठी तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर झाले . त्यानंतर हा निधी सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने मिळाल्याचे फलक संपूर्ण श्रीवर्धन शहरात झळकले . सगळ्या श्रेयवादाच्या उहापोहानंतर एक वर्ष झाले तरी पेशवे स्मारकाच्या कामासाठी कोणत्याही हालचाली सुरु झालेल्या नसल्याचे पहावयास मिळत आहे . श्रीमंत पेशवे यांचे देशाच्या इतिहासात महत्वाचे योगदान आहे . त्यांचे होणारे स्मारक हे इतिहासकारांच्या संकल्पनेतून साकारले जावे अशी सर्वांची इच्छा आहे त्याठिकाणी कोणत्याही पद्धतीचे आधुनिक विद्युत रोषणाई वैगरे असणारे स्मारक नसावे अशी समस्त नागरिकांची संकल्पना आहे . पेशव्यांची जन्मभूमी हि एतिहासिक वास्तू आहे त्या परिसराचे सुशोभीकरण किंवा विकास करताना त्याचे एतिहासिक महत्व जपले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे . त्या ठिकाणी पेशवेकालीन वस्तुंचे संग्रहालय असावे . पेशवेकालीन इतिहासाची माहिती चांगले फलक लाऊन येणार्या पर्यटकांना पाहता येईल अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे श्रीवर्धन तालुक्यात येणारे पर्यटक श्रीमंत पेशव्यांची जन्मभूमी पाहण्यासाठी आवर्जुन येतात . पण त्याठिकाणी असलेली दुरावस्था पाहून नाराज होतात . सद्य स्थितीत पेशवे जन्मस्थान असलेल्या जागेवर एक कौलारू इमारत उभी आहे . या इमारतीच्या पुढच्या भागात एक रंगमंच बांधलेला आहे . काही वर्षांपूर्वी या रंगमंचावर ऑर्केस्ट्रा व प्रायोगिक नाटके होत असत . परंतु काही जागरूक नागरिकांनी या वास्तुचा ताबा असणाऱ्या श्रीवर्धन नगरपरिषदेकडे तक्रार करुन एतिहासिक वास्तुचे पावित्र्य राखले गेले पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी होणारे कार्यक्रम बंद केले . या इमारतीच्या आवारात पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुर्णाकृती पुतळा आहे . पेशवे स्मारकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नियुक्त करुन अत्यंत बारकाईने काम होणे अपेक्षित आहे . ज्या ठेकेदार कंपन्यांनी या अगोदर एतिहासिक ठिकाणांचे काम चांगल्याप्रकारे केले असेल अशा कंपन्यांना काम करण्यासाठी प्राधान्य द्यावे . स्मारकाच्या कामाचा आराखडा तयार करताना इतिहासकारांची मदत घेऊन आराखडा बनविल्यास सुशोभिकरण ऐतिहासिक वाटेल . तरी मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीची तातडीने दखल घेऊन पेशवे स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात करावी , अशी मागणी इतिहासप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे .

Post a Comment