म्हसळा : महेश पवार
म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हे व त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्या कामगिरीच्या सातत्याने म्हसळा शहरातील रस्त्याच्या दुतर्फ खाजगी वाहने रिक्षा , विक्रम , मोटार सायकल , कार , ट्रक , जीप अशा वाहने पाकिंग करीत म्हसळा शहरात वाहतूक कोंडी समस्या सातत्याने सर्व सामान्य नागरिकांना भेडसावत होती . या संदर्भात जुलै ते ऑगस्टपर्यंत १०३ चालकांवर कारवाई करुन विशेष म्हणजे शहरातून अल्पवयीन चालक ( विद्यार्थी ) यांच्यावर ३१ जणांवर कारवाई केली आहे . तसेच गाडी चालवित असताना मोबाईलवर बोलणे यांच्यावर ७ तर गाडीच्या क्षमतेच्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे , क्षमतेपेक्षा अधिक लोड व इतर १३ केसेस , शहराच्या मुख्य रत्यावर गाड्या पाकिंग करणे यांच्यावर १७ करुन १ जुलै ते ३१ जुलैपर्यत १०३ जणांवर कारवाई करून २१ हजार ८०० इतका दंड वसुल केला आहे अशा कारवाईमुळे आज म्हसळा शहर वाहतूक कोंडी मुक्त होताना दिसत आहे . म्हसळा शहरामध्ये एसटी . महामंडळाची एखादी बस शहरात आली की , म्हसळा शहर संपूर्ण वाहतूक कोंडी होत होती . पादचाऱ्यांना चालणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत होती . या वाहतूक कोंडीमुळे शहरातील सर्व सामान्य जनता अक्षरशा कंटाळली होती . या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी पदभार स्वीकारताच म्हसळा शहरामध्ये धडक कारवाईला सुरुवात केली . त्यामध्ये म्हसळा शहराच्या रस्त्याच्या दुतर्फ रस्त्यावरील उभी असणारी वाहने यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस स्टेशनने केले आहे.
म्हसळा पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे म्हसळा शहर हे नेहमी वाहतूक कोंडीमध्ये असते . परंतु , आताचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कोल्हे व त्यांचे कर्मचार्यांनी सुरेख नियोजन करून शहरातील वाहतूक कोंडी समस्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करीत प्रामाणिकपणे काम करीत आहेत.
-बाळशेठ करडे , म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष

Post a Comment