शासन दरबारी दिवेआगर समुद्रकिनारी जीवरक्षकांची तरतूद नाही : जिवरक्षक मानधन व पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर



दिवेआगर : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील समुद्रकिनारा पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यासह  महाराष्ट्रात प्रसिद्ध असून समुद्रकिनारा किलोमीटर लांबीचा आहे येथे वर्षांमध्ये दोन लाखाहून अधिक पर्यटक दिवेआगर पर्यटनासाठी येत असतात परंतु , पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या जीवसुरक्षा रक्षकाची नेमणूक तरतूदशासन दरबारी करण्यात आलेली नसून जीवरक्षकांना मिळणार्या तरतुदीतून दिवेआगर समुद्रकिनारा वगळण्यात आलेला असल्याचे समजते . तर शासकीय मानधनापासून जीवरक्षक वंचित असल्याने मानधन व पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे . कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम किनार्यावर पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करणे यांच्या परस्परपूरक संबंध विचारात घेऊन सप्टेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीकरीता कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीतून जीवसुरक्षा रक्षकांचे मानधन व खर्चाकरता ४५ लाख ५६ हजार रु . एवढा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन मान्यता दिली . तर रत्नागिरी , पालघर , सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्ह्यातील काशीद , हरिहरेश्वर , रेवदंडा , कोर्लई , मांडव , किहीम , आक्षी , नागाव या ८ समुद्रकिनार्यांवरील जीवसुरक्षा रक्षकांच्या मानधनाची तरतूद करण्यात आली . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारा हा कायमच पर्यटकांच्या पसंतीला उतरलेला आहे . मात्र येथील समुद्रकिनारी ठेवण्यात आलेल्या जीवरक्षकांच्या मानधनाची तरतूद करण्यात आली नाही . शासनाकडून मानधन उपलब्ध करण्यात आले नसल्याचे दिवेआगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या पत्रव्यवहारानुसार समजते . दिवेआगार समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते . अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात घडतात त्यामुळे शासन निर्णयानुसार राज्यातील समुद्रकिनारी फिरावयास येणार्या पर्यटक व स्थानिकांच्या सुरक्षेसाठी जीवसुरक्षा रक्षक तंटामुक्त नेमण्यासाठी निर्णय आवश्यक आहे मुरुड समुद्रकिनारी १४ विद्यार्थी बुडून घटना घडली होती . तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण ( वायरी ) समुद्रकिनारी ८ पर्यटक विद्यार्थ्यांचा बुडून अंत झाला . सदर घटनेमुळे समुद्रकिनारी पर्यटकांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने दिवेआगर समुद्रकिनारी वसुरक्षा रक्षक व त्यांचे मानधन शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सामजिक कार्यकर्ते तसेच दिवेआगरचे माजी तंटामुक्त गावअध्यक्ष देवेंद्र नार्वेकर यांनी म्हसळा Live च्या प्रतिनिधिंना सांगितले 


दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या जीवसुरक्षा रक्षकाला शासकीय मानधन मिळण्याबाबत ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याजवळ पत्रव्यवहार करण्यात आला आहे . तर पंचायतीच्या आर्थिक परिस्थितीनुसार मानधन देण्यात येत आहे.
-उदय बापट , सरपंच , दिवेआगर 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा