म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
दिघी माणगाव रस्त्याची अवस्था बिकट असताना सुध्दा दिघी पोर्टची ओव्हर लोड अवजड वाहतूक चालू आहे . या मार्गावर बऱ्याच वेळा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत बेशिस्त पणे गाडी चालवत असल्याचे पहायला मिळतात त्यामुळे या संपूर्ण परिसरातील जनतेत भयाचे सावट निर्माण झाले आहे अनेक वेळा यांची प्रशासनाकडे तक्रार करून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते . दोन दिवसांपूर्वीच माणगाव नजीक कंटेनर ने एसटी बसला विरुद्ध दिशेने धडक दिली होती सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी होताहोता वाचली . या सर्व तक्रारी प्रशासनाकडे वारंवार करून सुध्दा कोणतीही ठोस कारवाई प्रशासन करीत नाही . त्यामुळे यातून हेच सिद्ध होते कि प्रशासन मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे त्याचबरोबर प्रशासन नकी कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे असे म्हसळा तालुक्यातील युवासेना तालुका अधिकारी अमित महामूणकर यांनी माहिती देताना सांगितले आहे . तसेच वारंवार प्रशासना कडे तक्रार करून देखील प्रशासन दिघी पोर्ट च्या मुजोर ट्रेलर चालकांवर कारवाई का करीत नाही यामूळे दीघी माणगाव रस्त्यावर प्रवास करणारे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . त्याचबरोबर सर्व नियम धाब्यावर बसवून व पायदळी तुडवून भर दिवसा हि ओव्हर लोड अवजड वाहतूक चालूच असते याचा पंचक्रोशीतील नागरिकांनाच नव्हे तर शाळेय विद्यार्थ्यांना हि त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने या मुजोर ट्रेलर चालकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आणि प्रशासन नक्की कोणाचे हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या जबाबदारी खातर प्रशासना विरोधात तालुक्यातील शिवसेना , अवजड वाहतूक सेना , युवासेना यांच्या वतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी म्हसळा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
अनेक निवेदनांना केराची टोपली . . !
दिघी म्हसळा माणगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व दिघी पोर्ट अवजड वाहतूक याबत आतापर्यंत संबंधित खात्याचे मंत्री , वरिष्ठ अधिकारी , उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी , तहसीलदार पोलीस निरीक्षक , असे अनेकांना कित्येक निवेदने देण्यात आली आहेत परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही उलट निवेदन देणाज्यांना तेवढ्या वेळेपुरते गोड बोलून समज काढण्यात आली आहे त्यामुळे ही सर्व निवेदने केराच्या टोपलीत टाकली आहेत असेच म्हणावे लागेल .

Post a Comment