श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग , सीटीस्कॅन विभाग केवळ तंत्रज्ञ आणि मशीन नसल्याने अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे अतिदक्षता विभाग व सीटीस्कॅन मशीन उपजिल्हा रुग्णालयात बसविल्यास म्हसळा तालुक्यातील रुग्णाना सुध्दा त्याचा लाभ घेता येईल . तसेच बोर्लीपंचतन दिवेआगर , दिघी तसेच बाणकोट खाडी पलीकडील लोकांना सुध्दा श्रीवर्धन जवळ असल्यामुळे या सेवांचा लाभ मिळेल . आरोग्य विभागाने श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग व सीटीस्कॅन मशीन बसविण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे . काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरातील मध्यवर्ती भागामध्ये टिळक मार्गावर कुटीर रुग्णालय होते . अत्यंत जुनी झालेली इमारत , खराब स्वच्छता गृहे , गंजलेल्या खाटा , फाटलेल्या गाद्या रुग्णालयाच्या बाजूने वाहणारा सांडपाण्याचा नाला अशा अवस्थेत त्यावेळचे कुटीर रुग्णालय आस्तित्वात होते . अनेक वेळेस औषधे उपलब्ध नसायची . पण अशाही परिस्थितीत रुग्णालयात डॉक्टर चांगले मिळाल्यामुळे रुग्णालयात उपचार चांगल्या पध्दतीने केले जात होते . डॉ . मधुकर ढवळे , डॉ . श्री व सौ कोरे , डॉ . महेंद्र भरणे यांनी येणार्या रुग्णाना असेल त्या परिस्थितीत चांगली सेवा दिली . २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली . सुनील तटकरे यांना महाराष्ट्राचे अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला . श्रीवर्धन मतदारसंघाचे चित्रच बदलुन गेले श्रीवर्धन तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु झाली . सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असावी या संकल्पनेतुन तहसील कार्यालय , उपविभागीय आधिकारी , तलाठी , मंडळ आधिकारी , दुय्यम निबंधक कार्यालये मध्यवर्ती प्रशासकीय भवन बांधुन एकाच इमारतीत आणण्यात आली . बाजुलाच भुमि अभिलेख कार्यालय बांधण्यात आले आहे जुन्या कुटीर रुग्णालयाच्या जागी भव्य इमारत बांधुन श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले बाजूने वाहणारा सांडपाण्याचा नाला बंद करुन तो अन्य मागनेि वळविण्यात आला . उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत त्रियांसाठी वेगळा कक्ष करण्यात आला आहे बाह्यरुग्ण विभाग सुसज्य करण्यात आला आहे . रक्त संग्रहीत करण्यासाठी शीतपेटीची व्यवस्था करण्यात आली आहे . रुग्णालयात एक्सरे मशीन बसविण्यात आल्यामुळे गोरगरीबांना सोयीचे झाले आहे . अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया सुध्दा रुग्णालयात होत आहेत . नेत्र तपासणी साठी सुध्दा सोय करण्यात आली आहे रुग्णालयात दाखल असणाच्या रुग्णांची भोजनाची देखिल सोय केली जाते स्वच्छतेचा ठेका खाजगी व्यक्तीला देउन साफसफाई चांगली होत असते . फक्त आता गरज आहे ती अतिदक्षता विभागाची , कारण हार्ट टैक व अपघातातील रुग्ण श्रीवर्धन येथुन रुग्णवाहिके मधून माणगाव किंवा मुंबईकडे नेताना रस्त्यातच दगावण्याच्या घटना अनेकवेळा घडतात .
Post a Comment