श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहर हे तालुक्यामधील मुख्य ठिकाण आसुन श्रीवर्धन शहरामध्ये उपजिल्हा रूग्णालय , उपविभागीय कार्यालय , तहसिल कार्यालय , वनपरिक्षेत्र कार्यालय , पंचायत समिती , श्रीवर्धन पोलिसठाणे , श्रीवर्धन बसस्थानक , माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा कॉलेजेस , शासकिय व निमशासकिय बँका व कार्यालये मुख्य म्हणजेच श्रीवर्धन दिवाणी न्यायालय अशा प्रकारे विविध कार्यालय हे श्रीवर्धन शहरामध्ये असल्यामूळे श्रीवर्धन तालुक्यामधील खेडया पाडयातील नागरिक मोठ्या संख्येने दररोज दैनंदिन कार्यालयीन कामकाज , खरेदी विक्री तसेच उपजिल्हा रूग्णालय , खाजगी रूग्णालय येथे रूग्णांना उपचार घेण्यासाठी श्रीवर्धन शहरामध्ये हजारोंच्या संख्येने नेहमीच रूग्ण येत असतात . त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यात पेशव्याचे स्मारक , समुद्र किनारी सुशोभिकरण व निळाशार समुद्रकिनारा , माता सोमजाईदेवीचे मंदिर , नारळीपोफळिची झाडे , जिवनेश्वर तलाव , भुवनाळे तलाव , जीवना कोळीवाडा येथिल ताजी मासळीचा लिलाव हे पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक मोठया संख्येन श्रीवर्धन शहरामध्ये दररोज येत आसतात त्यामुळे श्रीवर्धन शहर नेहमीच गजबजलेला असते . त्यामुळे राज्यभरातुन आलेल्या पर्यटकाला किंवा श्रीवर्धन तालुक्यामधील खेड्यापाड्यातील आलेल्या नागरिकांना श्रीवर्धन बाजारपेठेत शौचालय झाल्यास त्याला सैरावैरा फिरावे लागते कारण श्रीवर्धन शहराच्या भर बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी व श्रीवर्धन एसटी बसस्थानक इत्यादी ठिकाणी शौचालयाची व्यवस्था श्रीवर्धन नगरपालिकेने केलेली नाही . त्यामुळे पर्यटक व नागरिक यांच्यामधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे स्वच्छता भारत निगम योजना अंतर्गत उघडयावर शौचालयाला जावु नये हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून घातक आहे अशाप्रकारे बॅनरबाजी मात्र करण्यात श्रीवर्धन नगरपालिका सध्यातरी अग्रेसरच्या भूमिकेत दिसत आहे .
Post a Comment