लेप चे सरपंच अंकुश खडस माध्यमाना विनंती करताना छाया चित्रांत दिसत आहेत.
संजय खांबेटे, म्हसळा
लेप ग्रामपंचायतींतील वाघाव, वाघाव बौध्द वाडी, कळकीचा कोंड, गौळवाडी, लेप मुळगांव, आदीवासी वाडी व वांगणी या सर्व गाववाडयाना जोडणारा नवशी, वाघाव, लेप हा ग्रामिण मार्ग ३५ रस्ता गेले ४६ वर्षे अपूर्णावस्थेत आसल्याचा दावा म्हसळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेंत लेप चे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी अंकुश खडस यानी केला .यावेळी त्यांच्या समवेत जि.प.च्या माजी सदस्य व प्रतोद श्रीमती वैशाली सावंत, म्हसळा पं.स.च्या माजी सभापती श्रीमती अनिता खडस, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यंकटेश सावंत, उपसरपंच श्रीमती शुभांगी तांबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , सर्व वाडयांचे पदाधीकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमचे ग्रामपंचायत हद्दीचे सुमारे ४ ते१५ कि.मी. परिघांने राज्य मार्ग ९९ व राज्य मार्ग ९१ हे अतीशय सुसज्ज असे रस्ते आहेत. त्याना लेप ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामिण मार्ग ११६ जोडला तर ग्रामपंचा
यतीतील काही वाडयाना दळण वळणा साठी सुकर मार्ग तयार होणार आहे. यासाठी ग्रामिण मार्ग ११६ अपग्रेडेशन करून जिल्हा परिषदेकडून सार्वजनीक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा ही स्थानिकांची आग्रही मागणी आहे, गेले अनेक वर्षे ह्या मागणीकडे जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत आसल्याचा आरोप
खडस यानी पत्रकार परिषदेत केला. आम्ही ग्रामस्थ बुधवार दिं . ३ ऑक्टोबर २०१८ रोजी म्हसळा तहसील कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण करणार असल्याचे यावेळी खडस यानी सांगीतले .
अंकुश खडस व लेप पंचक्रोषी तील ग्रामस्थांची खंत
माणगांव व म्हसळा तालुक्यातील अनेक खडतर मार्गावरील रस्ते शासनाने पूर्ण केले, त्यामध्ये वाकी -हरखोल- गोवल, हरखोल्- घोडेधुम -सिलीम, गोरेगाव- कुमशेत- मांजरोणे, पुरार फाटा- खामगांव, आंबेत शिर्केताम्हणे -कासरळई हे सर्व रस्ते अवघड वळणे, प्रचंड चढ उतार असुनही झाले . मग स्थानिक लोकप्रतिनिधीं व प्रशासनाचे आमच्याकडे दुर्लक्ष का?
राज्य शासनाने हायब्रीड अॅन्युईटी च्या माध्यमांतून मंजुर असलेला अलिबाग - रोहा- कणघर -वावे रस्त्यात्याला २१५ लक्ष ८ हजार ८०० मंजुर झाले आहेत ते काम तात्काळ सुरु होणे आवश्यक आसल्याचे खडस यानी अभ्यासू मत यावेळी मांडले. यावेळी खडस व अन्य मंडळीनी लोकशाही कार्यप्रणालीत प्रसार माध्यमामाना विशेष महत्व असते आता आमचा प्रश्न तुम्हीच सोडवा अशी विनंती म्हसळा प्रेस क्लबला केली.

Post a Comment