म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथे स्थलांतरित करावा ; म्हसळा रुग्णकल्याण समितीचा ठराव



म्हसळा-वार्ताहर

तालुका शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्याने येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सद्यास्थितीत बंद आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण सेवा ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीत कार्यान्वीत होती गेल्या चार महिन्यापासून येथे 

ग्रामीण रुग्णालय कार्यान्वीत झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्ण सेवा बंद पडली आहे.हे आरोग्य केंद्र कायम जनतेच्या सेवेत रहावे म्हणुन म्हसळा पासुनच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि मोठी लोकवस्तीच्या पाभरे पंचक्रोशीत स्थलांतरित करावेत असा ठराव नुकताच म्हसळा रुग्णकल्याण समितीचे तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बबन मनवे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आढावा सभेत घेण्यात आला.सभेला समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरज तडवी,समिती सदस्य डॉ.राऊत,माजी सरपंच रामदास रिकामे,सुरेशदादा जैन,प्रकाश गाणेकर,फैसल गीते,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,बालविकास प्रकल्प अधिकारी श्री तरवडे,विस्तार अधिकारी दत्तु हिंदोला,अंगणवाडी पर्यवेक्षिका रेणुका पाटील,कनिष्ठ सहाय्यक महेंद्र रहाटे,आरोग्य सहायीका कल्पना उकिर्डे,आरोग्य सेवक जी एस. शिरसाठ,सेविका अमिता मोरे,कविता गढरी,ज्योती महाडीक,जी.आर.पाटील आदी मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.म्हसळा तालुक्यातील पाभरे जिल्हा परिषदेच्या गटात सुमारे 10 हजार लोकवस्ती आसुन लागुनच तळा तालुक्यातील मजगाव,वाशी,कुंभला,वरल ही मोठया लोकवस्तीच्या गावांची बाजारपेठ म्हसळा आहे.पाभरे येथे रुग्ण सेवेसाठी जिल्हा आरोग्य खात्याचे उपकेंद्र आहे.सदरचे उपकेंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरीत करून म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत केल्यास पाभरे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी चांगली सेवा मिळण्यास मदतीचे होणार आहे.सध्या स्थितीत बंद असलेले म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथे स्थलांतरित व्हावे यासाठी संपन्न झालेल्या रूग्णकल्याण समितीचे सभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.सभेत म्हसळा तालुक्यातील अन्य उपकेंद्रातील आरोग्यसेवेबाबत आढावा घेऊन जास्तीत जास्त ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा कशी देता येईल या बाबत सविस्तर चर्चा करून चालु हंगामात साथीचे रोग,लसीकरण,सर्प,विंचू व अन्य स्वापदे दंशावर उपचार त्या वर लागणारा औषध साठा आदी बाबतीत उपचारासाठी दक्ष राहण्याची काळजी घ्यावी असे समितीच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना अध्यक्ष बबन मनवे यांचे मार्फत सुचना देण्यात आल्या.सभेला अपघातात दापोली कृषी विद्यापीठातील मृत्यू पावलेल्या 30 अधिकारी व कर्मचारी,माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी आदि देश व राज्य पातळीवरील मयत मान्यवराना श्रद्धांजली वाहिली.तसेच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे,म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,नगराध्यक्षा फलकणाज हुर्जुक,उपनगराध्यक्ष संजय कर्णिक यांचे निवडीचे अभिनंदन ठराव प्रारीत करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत डॉ तडवी यांनी तर इतिवृत्त वाचन व आभार कनिष्ठ सहाय्यक महेंद्र रहाटे यांनी मानले.


जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले म्हसळा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत नसल्याने ते तालुक्यातील अन्य ठिकाणी स्थलांतर करता येईल का या बाबत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदीतीताई तटकरे यांचे कडे विचारणा केली असता हे काम आमच्या अधिकारात नाही,प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्या बाबतचा ठराव डीपीडिसीच्या सभेत मांडून तो मंत्रालयाचे आरोग्य विभागाने मंजुर केल्या नंतरच पुढील कार्यवाही करता येईल असे माहितीअंती सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा