संजय खांबेटे , म्हसळा
हिंदू धर्मीयांचे पवित्र श्रावण मासांत येणारे नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळ काला या सणांचे बरोबरीने मुस्लीम धर्मीयांचा येणारा बकरी ईद हे सर्व सण हे गुण्यागोवींदाने साजरे व्हावे या मुख्य हेतुने म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता सभेचे आयोजन तहसीलदार दालनांत करण्यात आले होते . यावेळी प्रत्येक नागरीकाला आपल्या संस्कृतीपणे धार्मिक सण साजरे करण्याचा हक्क आहे प्रत्येकाने सणाचा आनंद सकारात्मकतेने लुटावा असे उपस्थिताना स.पो.नी. प्रविण कोल्हे. यानी आवाहन केले. यावेळी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार, नायब तहसीलदार के.टी. भिंगारे , उपसभापती चाचले, माजी सभापती महादेव पाटील, तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, अलीशेठ कौचाली, संजय खांबेटे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, अशोक काते, सुरेशशेठ जैन, नंदूशेठ सावंत, खंगारशेठ रजपूत, मुकेश शेठ जैन, श्रीपद धोकटे, योगेश करडे, दुर्जन शेठ रजपूत,शाहीद उकये,नासीर मिठागरे, अस्लम चिलमाई, अनिकेत पानसरे, नथुराम भाया पाटील,उदयकुमार कळस, सुशील यादव , शशीकांत शिर्के, वैभव कळस,झलसींग रजपूत आदी प्रतिष्ठीत नागरीक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शांतता समितीचे मागील सभेचे प्रोसीडींग उपलब्ध नसल्याने सुसवातीलाच अडचणी ना तोंड देत सुखात झाली. उपस्थित बहुतांश मंडळी शहरांतील आसल्याने नगर पचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित का नाही ह्या उपस्थितांच्या प्रश्नाने आयोजकाना अडथळा शर्यत पार पाडावी लागली . शहरांतील वाहतुक कोंडी, मोकाट गुरे व कुत्र्यांचा त्रास, अधीकृत रिक्षा थांबे, S.T. वाहतुक , फेरीवाले व अन्य सर्व समस्या नगरपंचायत कार्यकक्षेत असल्याने अनुत्तरीत राहीले. चर्चेत सुभाष उर्फ बाळ करडे, सुरेश शेठ जैन, नासीर मीठागरे, शाहीद भाई, नंदूशेठ सावंत , अनिकेत पानसरे , योगेश करडे, मुकेश शेठ जैन आदीनी सहभाग घेतला.
तालुका शांतता सभेची आयोजकांची विषयवार तयारी नव्हती. तालुक्यातील खरसई, वारळ, मेंदडी, पाभरे, सकलप या मोठ्या वस्तीचे गावावर लक्ष केंद्रित केले नव्हते. कोणालाही आमंत्रित केले नव्हते.तसेच C.E.O. नगरपंचायत म्हसळे,म.रा.वि वि कंपनी, S.T. प्रशासन, P. W. D., M.S.R.D.C या महत्वाच्या खात्याचे मंडळीना बैठकीना बोलाविणे आवश्यक असताना का बोलाविले नाही ,का शासनाचा हा केवळ सोपस्कार होता .- महादेव पाटील , माजी सभापती.पं.स. म्हसळा

Post a Comment