श्रीवर्धन मध्ये मराठा समाजाचा शिस्तबद्ध व संयमी मोर्चा : महिला व तरुण मोठया संख्येने मोर्च्यात सामील


श्रीवर्धन प्रतिनिधी
 श्रीवर्धन मध्ये  मराठा समाजाने आरक्षणासाठी सोमजाई मंदिर ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला आहे .मोर्चा प्रसंगी श्रीवर्धन शहरात  कडकडीत बंद पाळण्यात आला .मोर्च्या कर्त्यांनी आपले निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना सादर केले .
 मराठा समाजाने दिलेल्या निवेदनात अनेक बाबींचा समावेश करण्यात आला होता .त्यामध्ये मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज आहे .आमच्या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे .पूर्वा पार आम्ही शेती करत आहोत .शेती ही च खरी आमची ओळख आहे.शेती ही वडिलोपार्जित प्राप्त झाली आहे . आज  आमच्या समाजात शैक्षणिक दृष्ट्या मागसलेपणात वाढ झालेली निदर्शनांस येत आहे .

आमच्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणे अशक्य प्राय झाले आहे .बौद्धिक दृष्ट्या सक्षम व कार्यप्रवण असलेला आमचा तरुण निराशेने ग्रासला आहे .ही बाब आमच्या समाजासाठी व पर्यायाने राष्ट्रासाठी निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. खुल्या प्रवर्गातून शिक्षण घेणे आमच्या समाजासाठी अवघड व अशक्य झाले आहे .समाजातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय किंबहुना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध नसल्या कारणे शिक्षणा कडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच आधुनिक शिक्षणा साठी पर्याप्त व वाजवी पैसा उपलब्ध होत नाही .त्याकारणे आमचा तरुण प्रगतीच्या व उत्कर्षाच्या मुख्य प्रवाहा पासून दूर फेकला गेला आहे. त्यामुळे त्याला मानसिक अस्वस्थतेने ग्रासले आहे .नोकरीत वर्ग एक व वर्ग दोन मध्ये आमचा तरुण अपवादात्मक रित्या आढळत आहे .तसेच इतर नोकरीत सुद्धा त्यास योग्य तो वाव मिळालेला नाही .आपली राज्यघटना आपणांस  समता व बंधुत्वाची शिकवण देते  .ती आम्ही प्रार्थनिय मानत आहोत .स्पर्धेच्या युगात आमच्या समाजाच्या उत्कर्षासाठी आम्हांस आरक्षण मिळणे अगत्याचे झाले आहे. अन्यथा आम्ही मुख्य प्रवाहा पासून दूर जाण्याचा मार्गावर आहोत .


समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार झालेला नाही त्या कारणे 75 %पेक्षा जास्त मराठा समाज कर्जबाजारी झाला आहे .मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्वात जास्त मराठा समाजाच्या आमच्या बांधवांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे  .त्या घटनांमुळे मन विदीर्ण व सुन्न झाले आहे .
 स्वातंत्र्य प्राप्ती पुर्वी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील गरीब जातींना आरक्षण दिले होते त्या जातींमध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता .परंतु स्वातंत्र्य प्राप्ती नंतर अन्याय   कारक रित्या मराठा समाजाला आरक्षणा पासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही बाब अतिशय त्रासदायक व क्लेशदायक  आहे .आज महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाच्या काही मोजक्या लोकांनी आपले प्रस्थ निर्माण केले आहे .परंतु त्यांना समाजाविषयी कुठे आस्था ,जिव्हाळा व प्रेम नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे .त्यामुळे त्यांचा समाज उद्धारासाठी काडीमात्र उपयोग नाही .सद्य स्थितीत मराठा समाज अनेक यातना भोगत आहे .आर्थिक स्थिती समाजाची खालवली आहे. त्या मुळे आम्हांस शिक्षण व नोकरी या मध्ये आरक्षण मिळावे ही विनंती आहे असे निवेदनात म्हंटले आहे .


     मोर्च्या प्रसंगी संतोष सापते, श्रीधर शेलार ,अनंत गुजर ,राजेंद्र भोसले, व वसंत यादव यांनी मराठा समाजाला संबोधित केले .मोर्चाचे निवेदन महिला प्रतिनिधी ऋतुजा भोसले, शुभांगी यादव, रंजना यादव, व प्राची दुदुस्कर आणि समाज प्रतिनिधी वसंत यादव, राजू भोसले, प्रदीप राऊत सुनील ठाकूर व दत्ताराम सुर्वे यांनी दिले .



श्रीवर्धन व म्हसळा तालुक्याचा एकत्र मोर्चा काढण्यात आला . श्रीवर्धन शहरात  मराठा समाजाला पाठींबा दर्शवण्यासाठी सर्वत्र बंद पाळण्यात आला .एस टी महामंडळाची एक ही बस आगारच्या बाहेर पडली त्यामुळे महामंडळाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.माध्यमिक शाळा सुरू होत्या परंतु वाहतुकीच्या साधना अभावी विद्यर्थि शाळेत पोहचू शकले नाही .व महाविद्यलयाने अगोदरच सुट्टी घोषित केली होती.
--------------------------------------------
मराठा आरक्षण हे आमच्या समाजाच्या दृष्टीने गरजेचे आहे .समाजात अनेक तरुण निराशेच्या गर्तेत अडकले आहेत .रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत .नोकरी मिळत नाही त्यामुळे समाजातील तरुण आत्महत्येकडे वळत आहे .माझी सरकार ला विनंती लवकरात लवकर मराठा आरक्षणा ला मंजुरी द्यावी
वसंत यादव (मराठा समाज तालुका अध्यक्ष )

आजचा मराठा समाजाचा मोर्च्या शांततेत पार पडला आहे .कुठलाही अनुचित प्रकार सदर प्रसंगी घडला नाही .वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली मोर्च्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे
सुरेश खेडेकर ( पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा