- दिघी : प्रतिनिधी
- श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे विलेपार्ल येथील गुरूस्थान लोकसेवा मंडळ आणि वडवली गावातील महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या संयुक्तपणे आरोग्य शिबीर संपन्न झाले . या शिबिराचे नेतृत्व बबन गोविंद नाक्ती यांनी केले . या शिबीर ला गावच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . सदर शिबिरास २६० हुन अधिक रुग्णांनी प्राथमिक उपचाराचा लाभ घेतला . या शिबिरात डॉ . अमोल पितळे आणि त्यांचे १३ सहकार्याच्या मदतीने रुग्णांचे उपचार केले . या शिबिराला सदिच्छा भेट देण्यासाठी , वडवली गावच्या सरपंच जयश्री कांबळे , उपसरपंच गौऱ्या रोटकर , वडवली आगरी समाज अध्यक्ष बळीराम कांबळे मनसे जनहित कक्ष माजी जिल्हाध्यक्ष फैजल पोपेरे , मनसे म्हसळा - श्रीवर्धन चे संपर्क प्रमुख शेखर सावंत , मनसे श्रीवर्धन उपतालुका प्रमुख वैभव , विनोद रिकामे , वडवली गावचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत बिराडी तसेच गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी किशोर बिराडी यांची मनसेच्या वडवली शाखाप्रमुख पदी नियुक्ती केली . या कार्यक्रमासाठी किशोर बिराडी , अनिल नाक्ती , महेश चौलकर , नयन धनावडे , स्वप्नील नाक्ती , अजय नाक्ती , मंगेश नाक्ती हे मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते . निलेश नाक्ती, किरण चाळके , हरिश्चंद्र चाळके व जयदीप तांबुटकर यांनी मोलाचे सहकार्य केले .

Post a Comment