दिवेआगर , वेळास खाडीवर पुलाची : मागणी पूल झाल्यास पर्यटनात होणार वाढ...


वेळास : वार्ताहर
हरिहरेश्वर , श्रीवर्धन , दिवेआगरला पर्यटक चांगले रमतात कारण रमणीय असं निसर्गरम्य सृष्टी सौंदर्याच वरदान लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील मौजे - दिवेआगर व मौजे - वेळास - आगर यामध्ये छोटी खाडी आहे पण देखणी आहे त्या खाडीवर पूलाची मागणी जोर धरू लागली आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बैं . ए . आर अंतुले यांच्या स्वप्नातील रेवस ते रेड्डी सागरी महामार्गावरील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर - वेळास खाडीवरील हा त्या काळातील प्रस्थावित पूल . परंतु बैं . अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अल्प कालावधीमुळे या मार्गाला जी चालना मिळायला हवी होती ती न मिळाल्याने रेवस ते रेड्डी मार्गावरचा हा या खाडी वरील पूल राज्य शासनाच्या कागदावरच राहिला . दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मूर्ती एका नारळी फोपळीच्या बागेत सापडली आणि दिवेआगरला पर्यटकांचा लोंढा वाढू लागला . महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या इतर प्रांतातुन असंख्य श्रद्धावान गणेश भक्त दर्शनासाठी येऊ लागले . बघता बघता दिवेआगर एक सुंदर पर्यटन स्थळ नावारूपाला आलं आणि श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा लोंढा वाहु लागला . दिवेआगर लगत असलेल्या वेळास गावात दिवेआगर वासियांची भातशेती , आंबा , नारळाच्या बागाही आहेत . वेळास परिसरातील काही मंडळी रोजगारासाठी दिवेआगरला जात - येत असतात . गेली कित्येक वर्षे या खाडीतून होडीने प्रवासी प्रवास करत होते . मात्र होडी वाहतूक बंद झाल्याने वेळास - दिवेआगर जाणे - येणे जास्त खर्चिक झाला . राज्य सरकारने या गंभीर समस्येचा विचार करावा . या खाडीवर पूल झाल्यास याचा फायदा पर्यटन क्षेत्र वाढिला होईल . आणि इथे असलेल्या सृष्टी सौंदर्यात आणखी भर पडेल असे नागरीकांचे म्हणणे आहे.

पुलाच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन देणार....
या कामी दिवेआगर ग्रामपंचायत व वेळास ग्रामपंचायत प्रयत्नशील आहेत . तसे ठरावही झाले आहेत . दिवेआगर ग्रामपंचायत मा . सरपंच वसंत गंद्रे सदर पुलाच्या मागणीसाठी लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे निवेदन सादर करणार आहेत . राज्य व केंद्र शासनाने या महत्वाच्या पुलाला मंजूरी देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे असे या परिसरातील नागरिकांची मागणी आहे यामुळे समुद्र मार्गावरील दिघी, नानवली , सर्वे , आदगांव , वेळास , वेळास आगर , दिवेआगर , भरडखोल , कोंडविली , शेखाडी , आरावी , वाळवटी या गावांना व श्रीवर्धन शहराला सागरी पर्यटन वाढीचा रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा