प्रतिनिधी : म्हसळा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतीक विभागातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली याकार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. जाधव सर ,इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. संजय बेंद्रे अकाऊंट विषयाचे प्रमुख प्रा.सुरेश दुंडे महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.राय्यप्पा माशाले अर्थशास्र विभागाचे प्रमुख प्रा.एस.सी.समेळ तसेच म्हसळा प्रेसक्लबचे सहसचिव श्री.वैभव कळस हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरूवातीस महाविद्यालयातील अकाऊंट विषयाचे विभाग प्रमुख प्रा.श्री.सुरेश एस दुंडे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर सांस्कृतिक विभागा तर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्याची माहीती देणारा माहीतीपट दाखवण्यात आला त्यानंतर महाविद्यालयातील अजिवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा.कानिफनाथ भोसले यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या पत्रीसरकार याबाबत आणि तुफानी सेनेच्या कार्याबाबत विविध दाखल्याच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच नाना पाटील हे ब्रिटिश सरकारच्या सैनिकांना कश्यापध्दतीने चकवा देऊन आपले कार्य पुर्ण करायचे याची माहीती विविध ऐतिहासीक दाखल्याच्या आधारे दिली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी कु.ग्रीष्मा पोतदार हीने केले तर आभार प्रदर्शन कु. तनया शिंदे हीने केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. शिरीष समेळ यांच्या मार्गदर्शन खाली श्री.मोहन जाधव,, अक्षय बांद्रे , निखिल कदम ,ओकार खोत या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी होते

Post a Comment