पंचायत समितीच्या आढावा सभेत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांंनी दिले शासकीय अधिकारी वर्गास आदेश
20%जिल्हा परिषद सेस अंतर्गत लाभार्थ्यांना केले साहित्याचे वाटप
(म्हसळा - प्रतिनिधी )
म्हसळा तालुक्यात शासनाचे शिक्षण,विज,पाणी पुरवठा,आरोग्य,बांधकाम,खारभुमी, कृषी, वनविभाग,एसटी महामंडळ आदि विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन विकास कामांसाठी विविध प्रकारच्या योजनेतुन देण्यात येत असलेल्या लोकपयोगी योजना, मंजुर इमारती बांधकाम,नादुरस्त इमारत दुरुस्ती,रस्ते बांधकामासाठी भरघोस निधीची तरतुद करण्यात आली आहे.मंजुर लोकपयोगी कामे शासन स्तरावर कागदोपत्री किंवा तांत्रिकदृष्ट्या विलंबाने होत आहेत अशा कामांची तातडीने दखल घेऊन शासनाचे संबंधीत अधिकारी वर्गाने विकास कामे गतिमान करण्यासाठी दखल घ्यावी आणि मंजुर विकास कामांची लागलीच पुर्तता करण्यात यावी असे आदेश वजा सुचना रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुका पंचायत समितीच्या आढावा सभेत प्रश्नोत्तर कार्यक्रमात दिल्या.याच वेळी म्हसळा पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद 20% सेस अंतर्गत खामगाव आदिवासी वाडी,कुडतुडी आदिवासीवाडी,ढोरजे बौद्धवाडी,चिचोंडे,संदेरी आदिवासीवाडी येथील लाभार्थी वर्गाला व्यायामशाळा साहित्य,प्लास्टिक खुर्च्या,लोखंडी कपाटे जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. आयोजित साहित्य वाटप व पंचायत समिती आढावा सभेला सभापती उज्वला सावंत,उप सभापती संदीप चाचले,जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे,सदस्या धनश्री पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर गायकर,सदस्या छाया म्हात्रे,माजी सभापती नाझीम हसवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,गट विकास अधिकारी श्री प्रभे, गट शिक्षण अधिकारी श्री शेटगे,बालविकास प्रकल्प अधिकारी श्री तरवडे,जेष्ठ कार्यकर्ते अंकुश खडस,शाहिद उकये, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,युवक अध्यक्ष फैसल गीते,अनिल बसवत,सतीश शिगवण, किरण पालांडे,प्रकाश गाणेकर,जलाल जहांगीर,श्री म्हसकर,श्री घोसाळकर,जि.प.पाणी पुरवठा अभियंता श्री गांगुर्डे, बांधकाम अभियंता आर.एच.काकुलसे,वीज अभियंता यादव इंगळे,कृषी अधिकारी शिवाजी भांडुपकर,अभियंता शेख,वनविभाग अधिकारी बाळकृष्ण गोरणाक,एसटी विभाग अधिकारी अनिल सावंत,सहा.अभियंता मेंदाड,श्री पवार,कक्ष अधिकारी एच.बी.इंदुलकर,विस्तार अधिकारी दिघीकर आदी मान्यवर कार्यकर्ते,अधिकारी व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी विविध योजनांतून शासनाचे सर्वच खात्यांत लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे परंतु काही ठिकाणी अधिकारी वर्गाचे कमतरतेमुळे आणि नियोजना अभावी अनेक कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत मंजुर व प्रस्तावित कामे तातडीने पुर्ण करावीत अशी मागणी उपस्थित पदाधिकारी यांनी आढावा सभेत निदर्शनास आणले असता अध्यक्षा आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला मंजुर कामांचा उरक तातडीने करावा असे सांगितले.याच वेळी अध्यक्षा आदीतीताई यांनी म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचतीनी स्वच्छ ग्राम योजनेत सहभागी व्हावे आणि शासनाच्या वतीने बक्षीस प्राप्तीसाठी प्रस्ताव पाठवावेत असे गटविकास अधिकारी श्री प्रभे यांना सुचित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गटविकास अधिकारी श्री प्रभे यांनी तर सुत्रसंचालन विस्तार अधिकारी दिघीकर यांनी केले.

Post a Comment