म्हसळ्यात बकरी ईद उत्साहांत साजरी : तालुक्यातील बहुतांश आधिकाऱ्यानी दिल्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा...


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरांत बकरी ईद उत्साहांत साजरी करण्यात आली. जामा मशिदीत मौलाना अब्दुल मुईज मदनी यानी सर्व उपस्थित मुस्लीम बांधवाना नमाज पठण केले. नंतर मुस्लीम बांधवानी एकमेकाना बकरी ईदीच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके, स. पो.नी. प्रविण कोल्हे, नगर पंचायतीचे C.E.0. वैभव गारवे ब अन्य अधिकाऱ्यानी मुस्लीम जमातीचे पदाधिकारी महमदअली पेणकर,नाझीम चौगुले, रफीक भाई चणेकर,फजल हळदे,मुब्बशीर जमादार, नासीर मीठागरे, शकील उकये, अस्लम चिलमाई, अ.सलाम हळदे आदी मान्यवर यांना गुलाबपुष्प देऊन अभिनेदन  केले व शुभेच्छा दिल्या.


गोवंश हत्या बंदीच्या निर्णयामुळे म्हसळा जामा  मशीद कमीटी व १९ गावांतील मुस्लीम बांधवानी तालुक्यात कुर्बानी बाबत घेतलेला निर्णय हा फार कौतुकाचा व अभिनंदनीय तालुका शांतता समीतीने त्याबाबत अभिनेदनाचा ठराव घेतला आहे.
प्रविण कोल्हे, स.पो.नी. म्हसळा पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा