संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील दिव्यांग(अपंग) व्यक्तींना आवाहन करण्यात येते कि, श्रीवर्धन तालुक्याचे तहसीलदार श्री.जयराज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तहसिल कार्यालयातर्फ दिव्यांग चिकित् सा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी
दिव्यांग लाभार्थीना प्रमाणपत्र(Handicap Certificate) देण्यात येणार आहे.सदरचे शिबिर श्रीवर्धन तालुक्याचे प्रांताधिकारी श्री.प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. श्री.अजित गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तरी सदर शिबिरात श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभागी होऊन प्रमाणपत्राकरिता चिकित्सा करून घ्यावे जेणेकरून या प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे
1) २ फोटो
2) आधार कार्ड
3) रेशनकार्ड
4) वयाचा दाखला
ठिकाण : तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय श्रीवर्धन
दिनांक :२४/०८/२०१८
वेळ : स.१०:०० ते सा. ५:००
संपर्क : निलेश नाक्ती 8097346215
रजाने साहेब 775073158
किरण चाळके 7276698503
गजानन निंबरे 9657656272

Post a Comment