श्रीवर्धन जीवनाबंदर येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था...


श्रीवर्धन - भारत चोगले
श्रीवर्धन मधील जीवना या ठिकाणी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या बाबत अनेकवेळा मागणी करूनही याकडे श्रीवर्धन नगरपालिका लोकप्रतिनधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जीवना बंदर या ठिकाणी स्मशानभूमी असून श्रीवर्धन शहरातील महेश्वर आळी , विठ्ठळआळी , जिवनेश्वरकोंड , विचंवाचाकोंड , गायगोठण , रामगोठण , जीवनाकोळीवाडा खालचा विभाग व वरचा विभाग या ठिकाणचा एखादी व्यक्ती मरण पावली तर त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी खालचा जिवना कोळीवाडा वडाजवळील जीवना बंदर स्मशान भुमीमध्ये नेले जातो . परंतु त्या ठिकाणी चिखल , सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे . रात्री बऱ्याचवेळा त्या ठिकाणची लाईट हि गेलेली असते . अंत्यविधी करण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई भासते . स्मशानभूमीत अग्नी देत आसताना पावसाच्या पाण्याने ती वीझु नये यासाठी शेड बांधली नसल्याने पावसाळयामध्ये अंत्यविधी करतांना त्रास सहन करावा लागतो . या गोष्टीची कल्पना असुनही श्रीवर्धन नगरपालिका लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे या ठिकाणी श्रीवर्धन नगरपालिका व प्रशोसनाकडुन ठोस असे पावले उचलण्याची अत्यंत गरज आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा