दांडगुरी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील मंदिरात रायगड रत्नागिरी , सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेचे आ . अनिकेत तटकरे यांनी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भेट देऊन अभिषेक केले . श्रीवर्धन मतदान संघात आ सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून आ . अनिकेत यांचा जनसंपर्क आहेच . शिवाय नुकतीच त्यांनी विधानपरिषद आमदारकी देखील आपले अस्तित्व दाखवत निवडणूक जिंकली . त्यामुळे त्यांचे आता राष्ट्रवादी पक्षात वजनदार युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे युवा कार्यकर्यांना एक संघटित ठेवण्यात खास कौशल्य असल्याने श्रीवर्धन मतदार संघात त्यांची अनिकेत भाई म्हणूनच ओळखले जाते . आता तर ३ जिल्ह्यात विधानपरिषद प्रतिनिधित्व करताना त्यांना सर्वांना आपलेसे केले आहे सकाळी हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेतले नंतर त्यांचा श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी कडून सत्कार आयोजित केला आहे तत्पूर्वी सकाळी सहा वाजता मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले .

Post a Comment