म्हसळा प्रतिनिधी
देशातील जास्त उत्पन्न ( श्रीमंत ) गटांतील व्यक्तींना गॅस सबसिडी सोडल्याने चे पंतप्रधानानी केलेले आवाहन स्विकारल्याने देशांत पंतप्रधान उज्वला गॅस योजना यशस्वी झाली, ही योजना म्हणजे देशांतील B.P.L. कुटुंबाना वरदान ठरली स्वच्छ इंधनामुळे गोरगरीबांचे आरोग्य सुधारले असे अभ्यासू मत रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यानी म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे उज्वला योजने अंतर्गत गॅस वाटप करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाला रायगड जिल्हयाचे उपाध्यक्ष व श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष मा.श्री. कृष्णा कोबनाक ,मा.श्री.प्रशांत शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष,श्री. पंकज शहा विस्तारक श्री.कैलास पायगुडे, तळा तालुका अध्यक्ष श्री.मंगेश शिगवण, सरचिटणीस श्रीवर्धन तालुका श्री. शैलेश खापणकर शहर अध्यक्ष श्रीवर्धन, श्री.शैलेश पटेल तालुका अध्यक्ष म्हसळा,श्री.प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस, श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस,श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष म्हसळा, सौ.मीना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, श्री.भालचंद्र करडे तालुका उपाध्यक्ष, श्री.सुनील शिंदे किसान मोर्चा अध्यक्ष,श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस,श्री. समीर उर्फ भाऊ गद्रे, गॅस एजन्सी दिवेआगर,श्री.प्रकाश कोठावळे सोशल मीडिया सेल संयोजक,श्री.मनोहर जाधव अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा,उपस्थित होते.आमदार ठाकूर यानी संपूर्ण देशांत ही योजना प्रचंड यशस्वी ठरताना प्रथम टार्गेट ५करोड लाभार्थीचे ते पूर्ण होऊन ३१ मार्च २०१९ पर्यंत ८ करोड B. P.L. कुटुबाना गॅस कनेक्शन देण्यांत येणार आसल्याचे सांगितले यासाठी रु १२ हजार ८०० तरतुद करण्यात आली आसल्याचे सांगितले. यावेळीमें दडी येथील उज्वला योजने अंतर्गत परिसरातील नऊ लाभार्थीना गॅस कनेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमांचे आयोजन महेश पाटील जिल्हा चिटणीस युवा मोर्चा व सौ.सुनंदा पाटील तालुका चिटणीस महिला मोर्चा म्हसळा तालुका यांनी केले होते.
फोटो - म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे उज्वला योजने अंतर्गत लाभार्थीना गॅस कनेक्शन वाटप करताना आ. प्रशांत ठाकूर, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष प्रशांत शिंदे व इतर मान्यवर दिसत आहेत.

Post a Comment