श्रीवर्धन प्रतिनिधि : संतोष सापते
राज्यसरकारी कर्मचारी वर्गाने विविध प्रलंबित मागण्या संप सुरु केले आहे.या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत .सर्व शासकीय कार्यालय ओस पडलेले निदर्शनांस येत आहेत.
राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यात सातवा वेतन आयोग लागू करणे, अंशदायी पेंशन योजना रद्द करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, निवृत्ती चे वय 60 वर्ष करणे या सर्व मागण्यांचा समावेश आहे.
राज्यसरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सदरचा संप पुकारण्यात आला आहे. महसूल कर्मचाऱ्यानी आपल्या मागणी चे निवेदन तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांच्या कडे सूपूर्त केले. या पूर्वी। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 11/12/2017 रोजी आपल्या प्रलंबित मागण्या संदर्भात राज्यव्यापी निदर्शने केली होती .22 फेब्रुवारी 2018 रोजी महामोर्चा काढला होता परंतु विद्यमान राज्यसरकारने
कर्मचारी वर्गाच्या प्रमुख प्रलंबित मागण्याची पुर्तता केली नाही .सदर संपात तहसील ,प्रांतकार्यालय, पंचायत समिती मधील वर्ग 3 व वर्ग चार च्या सर्व कर्मचाऱ्यांनी शँभर टक्के सहभाग घेतला आहे. सदर संपाचा वाहतुक व्यवस्थेवर काडीमात्र परिणाम झालेला नाही .तालुक्यातील सर्व वाहतुक सुरळित पणे सुरू आहे .संप काळात कुठे ही गैर प्रकार घडला नाही .श्रीवर्धन नगरपालिकेच्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांनी फक्त काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला आहे .प्रत्यक्ष संपात सहभाग घेतला नाही .त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज सुरळीतपणे पार पडले आहे.तसेच सरकारी दवाखान्यातील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या नियोजित कामगिरी सुरळीत पणे बजावना निदर्शनांस आला आहे . श्रीवर्धन शहरातील रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------------------------
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे .त्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवले जाईल .आज सभापती निवडीचे काम पुर्ण करण्यात आले.
जयराज सूर्यवंशी (तहसिलदार श्रीवर्धन )
---------------------------------
आमच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्या अन्यथा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन तीव्र केले जाईल .आम्ही दोन वर्षात अनेकदा राज्यसरकार कडे आमच्या मागण्या सनदशीर मार्गानी सादर केल्या आहेत .चौथा ,पाचवा व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे .
रमेश दवटे
(महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन :अध्यक्ष
श्रीवर्धन )
आज श्रीवर्धन रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपलीनियोजित कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडली आहे .त्यामुळे शहरातील रूग्णांना कुठलाही त्रास झालेला नाही .
डॉ . मधुकर ढवळे ( तालुका शल्यचिकित्सक श्रीवर्धन)
आम्ही प्रलंबित मागण्यासाठी चार वेळा संप केला आहे .परंतु विद्यमान राज्यसरकार प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देते बाकी काहीच करत नाही. त्या कारणास्तव आज पुन्हा राज्यभर संप पुकारण्यात आला आहे .
सरकारने तात्काळ मागण्या संदर्भात योग्य कार्यवाही करावी
बाबू जगदेव रजाणे(महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष श्रीवर्धन )




Post a Comment